ETV Bharat / city

Shivsena Vs BJP In Mumbai: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर शिवसेना - भाजप कार्यकर्ते भिडले - शिवसेना कार्यकर्ते नाराज

कर्नाटकातील बंगळुरू ( Bangalore In Karnataka ) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) करण्यात आली होती. त्याचे पडसाद मुंबईत उमटले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर शिवसेनेने जोरदार निदर्शने करत ( Shiv Sainiks Protest BJP Office ) आंदोलन केले. यावेळी शिवसेना व भाजप कार्यकर्ते आपसात ( Shivsena Vs BJP ) भिडले.

भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा हल्लाबोल

author img

By

Published : Dec 19, 2021, 12:52 PM IST

मुंबई - बंगळुरू ( Bangalore In Karnataka ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) केल्याप्रकरणी त्याचे पडसाद राज्यभर ठिकठिकाणी दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांनी पोस्टरबाजी करत कर्नाटक सरकार व भाजप विरोधात घोषणा ( Shiv Sainiks Protest BJP Office ) दिल्या. याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर शिवसेना - भाजप कार्यकर्ते भिडले
आपसात भिडले कार्यकर्ते

भाजप प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसैनिकांनी आंदोलन केल्याने प्रदेश कार्यालयातील कर्मचारी व खाजगी सुरक्षा रक्षक यांनी आंदोलनकर्त्याना आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले. यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची पाहायला ( Shivsena Vs BJP ) मिळाली. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नरिमन पॉईंट या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जमा झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना त्याब्यात घेतले आहे. याप्रसंगी बोलताना पांडुरंग सकपाळ म्हणाले की या घटनेचा निषेध फक्त शिवसैनिक करत नाही आहेत तर प्रत्येक शिवप्रेमी या घटनेचा निषेध करत आहे. म्हणून अशा पद्धतीचे पडसाद फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रभर उमटताना दिसणार आहेत.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील बंगळुरु येथे शुक्रवारी रात्री उशिरा संभाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या घटना होतच असतात असं वक्तव्य केल्याने शिवसैनिक अजूनही संतापले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याचसोबत या प्रकराची तीव्र निषेध विविध ठिकाणी आता केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.