ETV Bharat / city

Varsha Raut at ED office: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत मुंबईतील ईडी कार्यालयात

author img

By

Published : Aug 6, 2022, 10:55 AM IST

Updated : Aug 6, 2022, 11:22 AM IST

ED Summoned to Varsha Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे.

Varsha Raut at ED office
Varsha Raut at ED office

मुंबई - शिवसेना राऊत यांच्या पत्नी राऊत मुंबईतील ईडी कार्यालयात भेटल्या. आज त्यांची चौकशी होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एकीकडे गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे ईडीने राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळे संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) चौकशी होणार आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ED कडून निर्देश देण्यात आले आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही आज ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते व आज त्या त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चौकशीसाठी कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजाण्यात आले. आज त्यांना चौकशीसाठी बोलवल्या नंतर वर्षा राऊत या ईडी कार्यालयात दाखल झालेल्या आहेत. या ईडी कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर संजय राऊत यांना ठेवण्यात आलेले आहे.

प्रवीण राऊत यांच्याकडील पैशांमधून मालमत्ता खरेदी - गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाला प्रकरणांमध्ये या अगोदर प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांच्याकडे ११२ कोटी रुपये असल्याचे समोर आलं होतं. त्यापैकी १ कोटी ६ लाख रुपये हे प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून खासदार संजय राऊत व त्यांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. त्याचबरोबर एका अनोळखी व्यक्तीकडून १ कोटी ८ लाख रुपये सुद्धा संजय राऊत व त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाले होते. या प्रकरणाची सुद्धा चौकशी आज होणार आहे. त्याचबरोबर जमिन व फ्लॅट या अगोदरच ईडीने जप्त केले आहेत. परंतु प्रवीण राऊत यांच्याकडून भेटलेल्या पैशानंतरच राऊत दाम्पत्यांनी ही मालमत्ता खरेदी केली गेल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भामध्ये ही आज चौकशी सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय राऊत व वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता - या प्रकरणात अगोदरच ई डीच्या अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांची व त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या दोघांचीही समोरासमोर बसून आज चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. कारण प्रवीण राऊत यांच्या खात्यातून जे पैसे वर्ग करण्यात आले होते या ते या दोघांच्याही खात्यात गेले होते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीकडून ही यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले आहेत म्हणून या प्रकरणी एकंदरीत दोघांचीही समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अगोदर या प्रकरणांमध्ये अलिबाग येथील जागेचे मूळ मालक व त्याचबरोबर या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या स्वप्न पाटकर यांचीही ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा आज वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात.

राऊत कुटुंबातील सदस्य भाऊक - या प्रकरणामध्ये खासदार संजय राऊत हे या अगोदरच ई डी च्या अटकेत असल्याकारणाने राऊत कुटुंबीयांवर प्रचंड तणाव आहे. त्यातच आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनासुद्धा ईडी ने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. वर्षा राऊत जेव्हा ईडी कार्यालयात आल्या त्याप्रसंगी त्यांच्यासोबत संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत, त्याचबरोबर संजय राऊत यांची मोठी मुलगी व जावई हे सुद्धा उपस्थित होते. वर्षा राऊत ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची मुलगी व जावई, त्याचबरोबर सुनील राऊत यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता.

हेही वाचा - Aslam Sheikh : माजी मंत्री अस्लम शेख यांना महाराष्ट्र पर्यावरण विभागाची नोटीस

हेही वाचा - Vice President Election Voting : उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, जगदीप धनखड-मार्गारेट अल्वा यांच्यात लढत

Last Updated : Aug 6, 2022, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.