मुंबई - काय सारखं सारखं दाऊद दाऊद लावलंय. मागची चाळीस वर्षे झाली या देशात विविध पक्षांची सरकारे आली आणि गेली. तेव्हापासून एकच सुरू आहे दाऊद दाऊद. हिम्मत असेल तर केंद्राने दाऊदला पाकिस्तानातून ( Sanjay Raut criticized central government from Dawood ) फरफटत आणून दाखवावे. अगदी अमेरिकेत लादेनला मारले तसेच. आहे का हिम्मत भाजपामध्ये ? दाऊद जिवंत आहे की मेला ? हे देखील त्या भाजपाच्या ( BJP ) लोकांना माहीत नाही. त्यामुळे आधी तो जिवंत आहे का ? याची माहिती घ्या आणि मग दाऊद दाऊद करा, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी केले आहे.
मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांच्यावर 16 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप केला असून, ईडीच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील गोवाला कंपाऊंडच्या भाडेकरूंकडून 14 वर्षात 11 कोटी रुपये भाडे म्हणून घेतले होते. यापैकी मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला ५५ लाख रुपये रोख दिले. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी थेट केंद्र सरकारला दिला आहे.
'आधी दर वाढवायचे नंतर कमी करायचे' : 21 तारखेला शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल या इंधनवरील कर कमी केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमती अनुक्रमे नऊ व सात रुपयांनी कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयावर देखील संजय राऊत यांनी निशाणा साधला असून, केंद्राने दर कमी केले आता राज्याला कमी करायला सांगत आहेत. हा निर्णय राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री घेतील. पण, आधी दर 15 रुपयांनी वाढवायचे नंतर नऊ रुपयाने कमी करायचे हा यांचा तिजोरी भरायचा फंडा आहे. जनतेची लूट सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवणे हे केंद्र सरकारचेच काम आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या सभेवर राऊत यांनी जास्त काहीही न बोलता 'देशात प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे. कोणाला संविधानानुसार सभा घ्यायच्या असतील तर त्या घ्याव्यात आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.