मुंबई - संजय राऊत यांच्या वकिलांकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दिलेल्या साक्षीची संदर्भ संजय राऊत यांच्या प्रकरणाची जोडला आहे. ज्याप्रकारे संजय राऊत यांच्या प्रकरणात साक्षीदार यांनी अनेकदा जवाब बदलला आहे. त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांच्या प्रकरणात असलेले आरोपी वाझे यांनी जवाब बदला होता. त्यावेळी न्यायालयाने वाझे यांचा जबाब अविश्वासार्ह असल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील देखील साक्षीदार यांचा जबाब आहे. त्यावर कशाप्रकारे विश्वास ठेवता येईल असे देखील प्रश्न संजय राऊत यांच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान राऊतांचे वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला. अलिबागच्या प्लॉट खरेदी प्रकरणात प्लॉटधारकांच्या जबाबात तफावत आहे. प्रविण राऊतांसोबत झालेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांबाबत आम्ही कोणतीही माहिती लपवून ठेवली नसल्याचे मुंदरगी यांनी सांगितले. पण तपास यंत्रणांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही कोणत्याही प्रकराचे मनी लॉण्ड्रिग किंवा कोणताही गुन्हा केलेला नसल्याचेही मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.
तसेच, आमच्या सर्व व्यवहारातील हेतू स्पष्ट होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या केसचे उदाहरण देत मुंदरगी म्हणाले अनिल देशमुख यांच्यावरही तीन आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले गेले. तसेच, संजय राऊत यांच्यावरही केले आहेत. पण हे दोन्ही खटले सारखेच आहेत. त्यांच्यावरही संस्थांमधून पैसे फिरवल्याचे आरोप करण्यात आले. पण जर या सर्व व्यवहारांची कागदपत्रे आहेत तर त्यांच्यावर हे आरोप का केले गेले असा सवाल मुंदरगी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अनिल देशमुख यांच्या केसचा आधार घेत संजय राऊत यांनाही जामीन देण्याची मागणी यावेळी मुंदरगी यांनी न्यायालयाकडे केली आहे.
संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तीवाद
2016 च्या राज्यसभा निवडणूक दाखल प्रतिज्ञापत्रात,55 लाख रुपये ही अमाउंट, माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून घेतल्याचं स्वतः स्पष्ट केलंय
हे फ्रेंडली कर्ज घेतलं होतं, ईडी समन्स जारी केल्यानंतर,55 लाख परत दिले
हे कोणतंही डाऊटफुल ट्रेनझक्शन नाही
वर्षा राऊत यांना अवनी इन्फ्रास्ट्रक्चर कडून पैसे आले नाही
हे ईडीचं अलिगेशन खोटं
अवनी कन्स्ट्रक्शन सोबत आर्थिक व्यवहार,तो ही रेकॉर्डवर आहे,त्यात लपवण्यासारखं काही नाही
प्रथमेश डेव्हलपर्स सोबत 35 लाख गुंतवणूक केली हे खरं
1 महिन्यात रक्कम परत घेतांना, मोठा आर्थिक फायदा करून घेतला,हा ईडीचा आरोप अमान्य
प्रवीण राऊत यांच्या स्टेटमेंट मध्ये हा व्यवहार स्पष्ट झालाय
ईडी अटर्नि जनरल अनिल सिंह यांनी केला हस्तक्षेप
अवनी इन्फ्रास्ट्रक्चर,अवनी कन्स्ट्रक्शन हा शब्दच्छल केला जातोय
कोर्टानं हस्तक्षेप करत यावर ईडी वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी मिळेल हे स्पष्ट केलं
मला या प्रकरणाचं गांभीर्य समजतं, माझ्या ऑर्डरचे काय परिणाम होतील,याची मला जाणीव आहे,सत्यापर्यंत पोचण्यासाठी मला मदत करा - न्यायाधीश
35 लाख आणि फायदा 15 लाख अशी रक्कम परत केल्याचं प्रवीण राऊत यांनी स्पष्ट केलंय
1 महिन्यात, खूप मोठा फायदा झाला,असा केलेला आरोप खोटा
अलिबागला खरेदी केलेल्या प्लॉटससाठी रोख रक्कम संजय राऊत यांनी दिली हा आरोप अमान्य
- - ईडीनं या प्रकरणात,प्लॉट मालकांचे 2 वेळा जबाब नोंदवण्यात आले
- - या दोन्ही जबाबात तफावत
- - पहिल्या जबाबात,आम्हाला रोख रक्कम मिळाली नाही हे सांगितलं
- - दुसऱ्या जबाबात पैसे मिळाले हे सांगितलं
मग खरा जबाब कोणता ? जबाब बद्दलणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवणार ? कोर्टाची परवानगी घेऊन ईडी अटर्नि जनरल अनिल सिंह यांनी कोर्टरूम सोडली,ईडीच्या वतीनं,सरकारी वकील कविता पाटील हजर
- एक प्लॉटधारक यांच्या 2 जबाबतील तफावत,ऍड अशोक मुंदरंगी यांनी कोर्टासमोर मांडली
- दुसऱ्या जबाबात,माझ्या वडिलांना संजय राऊत यांनी रोख पैसे दिले,याबाबत मला माहिती नाही
- संजय राऊत यांच्या वतीनं येणाऱ्या धमकीमुळे, प्लॉट विकावे लागले असा दुसऱ्या जबाबात आरोप
- एका जबाबात,झालेल्या व्यवहाराबद्दल कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा
- तर दुसऱ्या जबाबात,अनेक गंभीर आरोप
- अलिबाग प्लॉट जमीन खरेदी प्रकरणात सर्व प्लॉटधारकांच्या दोन्ही जबाबात तफावत
- प्रवीण राऊत यासोबत झालेल्या कौटुंबिक आणी गुंतवणूक आर्थिक व्यवहारांबाबत आम्ही कोणतीच माहिती लपवली नाही
- मात्र,तपासयंत्रणेनं,या व्यवहारांबाबत आमच्यावर खोटे आरोप केले
- कोणत्याही प्रकारचं मनिलॉन्डरिंग आणी गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य आम्ही केलेलं नाही
अशोक मुंदरंगी (जेष्ठ वकील) संजय राऊत यांच्यासाठी करताय युक्तिवाद -
- इंटेन्शन या एका शब्दाभोवती,आरोप केले आहे
- आमचं सर्व व्यवहारातील इंटेन्शन स्पष्ट होतं,आणी आम्ही काहीही लपवलं नाही
- अनिल देशमुख यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे 3 अलिगेशन्स केले गेले होते
- तसेच आरोप संजय राऊत यांच्यावर केलेय
- हे दोन्ही खटले बरेचसे सारखे
- त्यांच्यावरही संस्थांमधून पैसे फिरवल्याचे आरोप केले गेले
- जर सर्व व्यवहार कागदावर आहेत,तर लपवल्याचा आणी खोटे आरोप का ?
अनिल देशमुख केसमधील 3 आर्थिक आरोपांचे,संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी यांनी दिले दाखले. संजय राऊत यांना जामीन मिळावा याकरीता, राऊत यांच्या वकिलांनी घेतला अनिल देशमुख यांच्या केसचा आधार
- सचिन वाझे यांच्या जबाबावर, अनिल देशमुख याविरोधात केस उभी केली
- वाझे यांनी सातत्यानं जबाब बदलले
- वाझे यांच्या विश्वासार्हतेवर,कोर्टानंच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं
- तसंच संजय राऊत याबाबत होतंय
- संजय राऊत जामीन अर्ज प्रकरणात,अशोक मुंदरंगी यांचा युक्तिवाद झाला पूर्ण
- आज सायंकाळपर्यंत,अशोक मुंदरंगी अजून काही मुद्दे लेखी सादर करणार
- ईडीच्या वतीनं अटर्नि जनरल अनिल सिंह करणार युक्तिवाद
- 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी
मात्र हे प्रकरण अत्यंत कॉम्लिकेटेड असल्यानं मलाही याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार असही ते म्हणाले आहेत.