ETV Bharat / city

Shiv Sena leader Sanjay Raut Upset : शिवसेनेचे नेते संजय राऊत नाराज? मनधरणीसाठी धावपळ

author img

By

Published : Jul 12, 2022, 12:55 PM IST

Updated : Jul 13, 2022, 6:25 AM IST

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शेवटपर्यंत एकहाती किल्ला लढवणारे ( Fighting for Shiv Sena in Crisis ) बाजीप्रभू उर्फ संजय राऊत ( Shiv Sena Bajiprabhu alias Sanjay Raut )आता नाराज झाल्याचे समोर आले आहे. स्वकीयांच्या तीव्र विरोधामुळे ते नाराज झाले आहेत. मातोश्रीवर झालेल्या पक्षाच्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी भाजप पुरस्कृत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविण्याचे ठरविल्याने संजय राऊत एकटे पडले. त्यामुळे संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) नाराज झाल्याने, ते थेट सामना कार्यालयात निघून गेले. आता त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाईंना पाठवले आहे. ( Shiv Sena leader Subhash Desai )

Shiv Sena leader Subhash Desai
शिवसेना नेते सुभाष देसाई

मुंबई : शिवसेनेच्या संकटाच्या काळात शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडत खिंड लढवणारे ( ( Fighting for Shiv Sena in Crisis ) बाजीप्रभू उर्फ संजय राऊत स्वकीयांच्या तीव्र विरोधामुळे नाराज झाले आहेत. राऊत यांची मनधरणीसाठी आता सेनेची धावपळ सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मनधरणीसाठी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई ( ( Shiv Sena leader Subhash Desai ) यांना राऊत यांच्या मनधरणीसाठी पाठवले आहे. राऊत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसोबत युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापनेत राऊतांची ( succeeded in building with Congress NCP ) भूमिका महत्त्वाची होती. महाविकास आघाडीचे निर्मातेच संजय राऊतांना म्हटले जात होते. त्यांनी त्यांच्या कौशल्याने काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची मोट बांधण्यात यश मिळवले होते.

संजय राऊतांनी बाळासाहेबांंनंतर सामनातून मांडली शिवसेनेची भूमिका : यांच्यानंतर आजवर शिवसेनेची भूमिका संजय राऊत मांडत आले आहेत. २०१९ मध्ये भाजपने शिवसेनेला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी पुढाकार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीपासून महाराष्ट्रातील नेत्यांची मूठ बांधण्याचे काम राऊत यांनी केले. तसेच, अवघ्या दोन दिवसांत भाजपची सत्ता उलथून लावली. त्यामुळे शिवसेना म्हटली की, उद्धव ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांचे नाव पुढे येते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला अनेक संकटाचा सामना करावा लागला. राऊत यांनी यावेळी वारंवार भक्कमपणे पक्षाची बाजू लावून धरली.

खासदारांनी मांडला द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ४० आमदार त्यांच्या गटात सामील झाले. दिवसागणिक शिवसेनेला गळती लागली आहे. आता खासदारांनीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा न दिल्यास शिंदे गटाकडे जाणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. येत्या २० जुलैला निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी शिवसेनेची भूमिका ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली. १४ खासदार बैठकीला हजर झाले. दरम्यान, यूपीएच्या उमेदवाराला मतदान करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी मांडला. तसेच पक्षप्रमुख अधिकृत निर्णय जाहीर करतील असे स्पष्ट केले. शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. आजवर पक्षाची भूमिका समजून होकार दर्शवणाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच वेगळी भूमिका घेतल्याने संजय राऊत एकाकी पडल्याचे दिसून आले.

खासदारांनीसुद्धा संजय राऊतांवर फोडले खापर : बंडखोर आमदारांनी आधीच राऊत यांच्यावर बंडखोरीचे खापर फोडले आहे. खासदारांनीही आता तोच सूर आवळल्याने राऊत प्रचंड नाराज झाले. त्यामुळे बैठक संपताच राऊत यांनी थेट दै. सामनाचे कार्यालय गाठले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास ही नाराजी येताच ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना राऊत यांच्या मनधरणीसाठी पाठवले. देसाईंनी राऊत यांची भेट घेत, समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राऊत यावेळी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. ज्या भाजपने शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट घातला. ठाकरे परिवारावर आरोप करून बदनाम करायचा प्रयत्न केला त्यात भाजपशी जुळवून घेण्याची मागणी कितपत योग्य आहे, असा सवाल राऊत यांनी सुभाष देसाई यांना विचारला. सुभाष देसाई यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्याचे समजते.

हेही वाचा : Sanjay Raut on presidential election : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही- संजय राऊत

हेही वाचा : Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

हेही वाचा : BJP's Mission 134 on BMC Election : मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष्य; भाजपचे मिशन 134

हेही वाचा : Imtiyaj Jalil On Sharad Pawar : संभाजीनगर नावाला शरद पवारांनी तेव्हाच विरोध का नाही केला - इम्तियाज जलील यांचा सवाल

Last Updated : Jul 13, 2022, 6:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.