मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांच्या पत्नी मेघा सोमैया यांनी शिवडी न्यायालयात ( Shivdi court ) दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा दावा प्रकरणात संजय राऊत यांना 4 जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स शिवडी न्यायालयाने आज बजावले ( Sanjay Raut Summoned ) आहेत.
4 जुलैला न्यायालयात हजर होणाचे निर्देश - शिवसेना नेते संजय राऊतांनी किरीट सोमैया आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमैया यांच्यावर विक्रांत घोटाळा टॉयलेट घोटाळ्यात मोठे घोटाळे केल्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच आगामी काळातही सोमय्यांचे अनेक घोटाळे उघडकीस येतील असा दावा केला होता. त्यानंतर सोमैयांच्या पत्नीने या प्रकरणी राऊतांविरोधात 9 मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली होती. एवढेच नव्हे तर पोलिसांनी या प्रकरणी आठ दिवसात गुन्हा दाखल न केल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोमैयांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज न्यायालयाने राऊतांना समन्स बजावत 4 जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे शौचालय घोटाळा प्रकरण? - मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. यातील 16 शौचालयं बांधायचे काम किरीट सोमैया यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आलेलं. या प्रकरणी खोटी कागदपत्र देऊन मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. प्रताप सरनाईक यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला होता.
धक्कादायक बाब म्हणजे यातून साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची बिलंही घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. विधानसभेमध्ये देखील प्रताप सरनाईक यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा - Presidential Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर! 18 जुलै'ला मतदान तर 21 जुलै'ला मतमोजणी