ETV Bharat / city

Sanjay Raut Criticized Sambhaji Raje : 'संभाजीराजेंना विनंती त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घ्यावा' - शिवसेना नेते संजय राऊताचा संभाजीराजेंना चिमटा

उमेदवारीवरुन संभाजीराजेंनी शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या डिवचले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना छेडले असता, संभाजीराजेंनी ( Sambhaji Raje Chhatrapati ) संपूर्ण देश ताब्यात घ्यावा. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा संजय राऊतांनी काढला आहे.

Sanjay Raut Criticized Sambhaji Raje
Sanjay Raut Criticized Sambhaji Raje
author img

By

Published : May 26, 2022, 5:23 PM IST

Updated : May 26, 2022, 5:29 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंची कोंडी झाल्यानंतर मला स्वराज्य घडवायचे आहे, अशी ट्विट करत संभाजीराजेंनी शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या डिवचले. शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना छेडले असता, संभाजीराजेंनी ( Sambhaji Raje Chhatrapati ) संपूर्ण देश ताब्यात घ्यावा. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा काढला. शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि संजय राऊत यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा नामांकन अर्ज आज ( गुरुवारी ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित भरला. यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना संजय राऊत

'त्यांनी देश ताब्यात घ्यावा' : संभाजीराजेंनी स्वराज्य घडवणार असल्याचे ट्विट करत, शिवसेनेला डीवचले. संजय राऊत यांना याबाबत विचारले असता, संभाजीराजेंनी देशात सुस्वराज्य निर्माण करुन देश ताब्यात घ्यावा. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे सांगत संभाजीराजे छत्रपतींना चिमटा काढला आहे.

'दोन्ही उमेदवार निवडून येतील' : मी आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. खात्रीने सांगतो यावेळी सेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत निवडून जातील. शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहा जागांपैकी मविआचे ४ उमेदवार नक्कीच विजयी होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे उमेदवार असून ३१ तारखेला अर्ज भरतील. तसेच परंपरेप्रमाणे काँग्रेस आपला उमेदवार निश्चित करुन त्याचे नाव लवकरच जाहीर करेल आणि त्यानंतर अर्ज भरतील, असे राऊत म्हणाले. भाजपाने तीनच नव्हे चार जागा लढवल्या तरी फरक पडणार नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होईल, असा आशावाद राऊत यांनी व्यक्त केला.

'शिवसेना दबावाला भीक घालत नाही' : मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईबद्दल राऊतांना छेडले असता, या कारवाया सूडबुद्धीने होत आहेत, असा आरोप केला. ईडी, सीबीआयचा दबाव टाकून भाजपाला निवडणुका जिंकू असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी नक्की कारवाया कराव्यात. शिवसेना कोणाच्या दबावाला भीक घालत नाही. ही सुडबुध्दीने आणि बदल्याच्या भावनेने सुरु असलेली कारवाई महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला माहित आहे. त्यांनी एक लक्षात घ्यावे, हा काळ ही एक दिवस निघून जाईल नंतर सूत्रे आमच्या हातात येतील, असा सूचक इशाराही त्यांनी भाजपाला दिला.

हेही वाचा - ED Raid On Anil Parab : आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Last Updated : May 26, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.