मुंबई - दगाबाजी करतात ते कधी जिंकत नाहीत, त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावे, असे आव्हान मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केले. ( Shiv sena Leader Aaditya Thackeray On Rebel MLA ) शिवसेनेत माजलेल्या बंडाळीनंतर मंत्री आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबई महाराष्ट्र महानगर प्रदेशात आदित्य ठाकरे यांचे मेळाव्याचे सत्र सुरू झाले आहे. आज वरळी येथील बीडीडी चाळी येथील आयोजित कार्यक्रमात ही आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे उपस्थित होते.
जे इथून पळून गेले आणि स्वतःला बंडखोर म्हणवून घेत आहेत, त्यांना बंड करायचे असेल तर त्यांनी इथे करायला हवे होते. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवायला हवी होती, माझ्या समोर जेव्हा ते बसतील, माझ्या डोळ्यात बघतील आणि सांगतील आम्ही काय चूक केली, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ( Shiv sena Leader Aaditya Thackeray On Rebel MLA )
आमचे काय चुकले ते सांगावे - बीबीडीमध्ये आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना परवडणारी घरांच्या वाटप करण्यात आला आहे. हाच मोठा निकाल आहे. सर्वोच निकाल आला आहे. याबाबत माहिती घेऊन बोलतो. फोल्ड टेस्ट पेक्षा त्यांनी यावे आणि आमचे काय चुकले ते सांगावे. आम्ही फ्लोअर टेस्ट साठी तयार आहोत. तेथील काही लोक आमच्या संपर्कात आहेत. असे यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या राजकारण नाही, आता सर्कस झाली - वरळी येथील एका कार्यक्रमात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वरळीकरांना आपण नेहमी असेच बोलत रहा. तुम्ही मात्र वरळी सोडून जाऊ नका असे म्हणत बंडखोर आमदार आमदारांना टोला लगावला. संजय राऊत यांना ईडीचे समन्स बजावले आहे, याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राजकारण नाही, आता सर्कस झाली आहे.
बीडीडी पोलिसांच्या घरांच्या कार्यक्रमात बंडखोरांवर टीका - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ५० आमदारांसहित आसाममध्ये ठाण मांडून आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिवसैनिक आक्रमक झाला असून बंडखोरी विरोधात जोरदार निदर्शने, आंदोलने आणि तोडफोड सुरू आहे. दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरले असून मुंबई उपनगर पिंजून काढत आहेत. दरम्यानच्या, होणाऱ्या मेळाव्यात बंडखोरांना थेट इशारा देत आहोत. आज वरळी येथील बीडीडी पोलिसांच्या घरांच्या कार्यक्रमात बंडखोरांवर टीका केली.
शिवसैनिक तुम्हाला पडायला तयार - शिवसेनेवर आलेल्या संकट वगैरे नाही, खूप वर्ष काही काही जिल्ह्यांमध्ये दबून बसलेले लोक होते. दाबले गेलेले लोक होते, त्यांना आता पुढे येण्याची संधी आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे बंडखोर आहेत फुटीरवादी आहेत, त्यांच्यासाठी दोनच पर्याय उरलेले आहेत. डइस्कॉलिफाय होण्याचा किंवा भाजपमध्ये किंवा प्रहार मध्ये किंवा मनसेमध्ये जाण्याचा, पर्याय आहे. ते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत इथे प्रत्येकाला पाडायला, प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक आणि महाराष्ट्राचा नागरिक उभा असल्याचे स्पष्ट केले.
डोळ्यात डोळे घालून बोला - बंडखोर आमदारांसंदर्भातला आज निकाल आहे. परंतु तो वाचला नसल्याने त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. काही सोबत गेले आहेत, त्यांना शिवसेनेसोबत असल्याचे भासवले जात आहे. फुटीरवाद्यांना शिवसेनेत जागा नाही. ज्यांना फसवून नेण्यात आले असून परत यायचा आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. मात्र एक लक्षात ठेवावे, दगाबाजी जिंकता येत नाही, कोणी जिंकू शकत नाही, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. फ्लोअर टेस्ट साठी आम्ही तयार आहोत, पण बंडखोर आमदार तयार होतील का? हा खरा प्रश्न आहे. ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावे, असे आव्हान मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. आता लपून बसले असले तरी कधीतरी समोर येतील, तेव्हा जाब विचारू असेही मंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. काही संपर्कात असून लवकरच शिवसेनेत परततील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
मित्र पक्षाने केली मदत - ज्यांच्यावर ती सर्वाधिक विश्वास ठेवला. ज्यांना परिवाराचे मानले, त्यांनीच धोका दिला. मात्र महाविकासआघाडी सोबत असलेल्या लोकांनी, पक्षातील लोक परिवारापेक्षा जास्त खंबीरपणे आमच्या सोबत ठाम उभे आहेत. विशेषतःशरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी आधार देत विश्वास दिला आहे. मात्र राज्यातील परिस्थिती वाईट असून लोकही संतापल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
उदय सांमत हे आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. ते कधी न कधी समोर येतील. आणि त्यांना डोळ्यात डोळे घालून बोलावे लागेल. आणि ते सांगतिल की आम्ही काय चुकीचे केले. अशी प्रतिक्रिया उदय सांमतांबद्दल विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Maharashtra Poltical Crisis: 38 आमदारांनी पाठिंबा काढला सरकार अल्पमतात - शिंदे गटाचा याचिकेत दावा