ETV Bharat / city

Sanjay Raut On The Kashmir Files : 'त्यांना आता काश्मीर आठवलं, इतकी वर्षे हे कुठं होते ?' राऊतांचा सवाल

author img

By

Published : Mar 17, 2022, 12:42 PM IST

Updated : Mar 17, 2022, 2:45 PM IST

संजय राऊत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता मुंबईत परतले ( Sanjay raut in mumbai ) आहेत. आज सकाळी त्यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी होळी सणानिमित्त राज्य सरकारने दिलेल्या नियमावली आणि द कश्मीर फाईल चित्रपट आदी विषयांवर ( Sanjay Raut On the Kashmir File ) चर्चा केली.

Sanjay Raut On the Kashmir File in mumbai
संजय राऊत

मुंबई - मागील काही दिवस संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त दिल्लीला असलेले संजय राऊत आता मुंबईत परतले ( Sanjay raut in mumbai ) आहेत. आज सकाळी त्यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी होळी सणानिमित्त राज्य सरकारने दिलेल्या नियमावली आणि द कश्मीर फाईल चित्रपट आदी विषयांवर ( Sanjay Raut On the Kashmir File ) चर्चा केली.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

आरोग्यासाठी असलेल्या नियमांवर राजकारण नको -

सरकारने काही नियम ठेवले असतील तर ते राज्याच्या हितासाठीच आहेत. विरोधी पक्षाने विरोधाला विरोध करू नये, एखाद्याला वैफल्य येऊ शकत सत्ता येत नसल्याने, पण ते वैफल्य अश्या टोकाला जाऊ नये की आपल्याच राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावे, आणि त्याच भविष्यात राजकारण करण्यात यावे. इतके टोकाचे राजकारण, इतके क्रूर राजकारण महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी केले नव्हते, आणि करू नये.

'32 वर्षे कुठे होते हे लोक'

त्यांना आता काश्मीर दिसतंय, काश्मीर फाईल सिनेमा आल्यावर त्यांना काश्मीर आठवले, 32 वर्षे कुठे होते हे लोक, हा फार संवेदनशील विषय आहे. लोकांनी मोदींना यासाठी मत दिलेले आहे की, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून अखंड हिंदुस्थान निर्माण करू असे त्यांनी सांगितले होते, त्याची आम्ही अजूनही वाट बघत आहोत. तो चित्रपट जर कोणाचा पॉलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

'तेदेखील भाजपने तेच होते'

पण बाळासाहेब ठाकरे हे एकमेव असे नेते होते, की काश्मिरी पंडितांना हातात शस्त्र द्या, ते आपलं रक्षण करतील, तेव्हा त्यांना अश्या प्रकारे वक्तव्य केले म्हणून विरोध करणारे केंद्रातील भाजप नेते होते. अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या लोकांना सांगितलं की तुमची हजला जाणारी विमान मी उडू देणार नाही, त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली, वैष्णव देवी यात्रा पार पडली.

हेही वाचा - Devendra Fadnavis welcome Nagpur : महाराष्ट्रात आज जर निवडणुका घेतल्या तर, भाजपच जिंकेल - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Mar 17, 2022, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.