मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ( बुधवारी ) 62 वाढदिवस मोठ्या उत्साहात मातोश्रीवर शिवसैनिकांकडून साजरा केला. यावेळी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले. सकाळपासूनच मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच थेट सर्वसामान्य शिवसैनिकांना भेटणार होते. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज मातोश्रीवर हजर झाले. मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटांचा ( Eknath Shinde group ) शिवसैनिकांना भेटण्याचा आरोपही खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे शेकडो शिवसैनिकांना ( Uddhav Thackeray birthday meet Shiv Sainik) थेट भेटले आहेत. त्यांच्या शुभेच्छा स्वतः मातोश्रीवर उद्धव ठाकरे स्वीकारत होते. तर दुसरीकडे यापूर्वी ते शिवसैनिकांमध्ये फार मिसळताना आढळून आले नाही. त्यामुळे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा या सगळा प्रयत्न डॅमेज कंट्रोलसाठी तर नाही? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडताना सातत्याने सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वेळ देत नसल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे आमदार असूनही उद्धव ठाकरे हे भेटायला वेळ देत नव्हते. आमदारांना भेट देत नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांना उद्धव ठाकरे काय भेटणार असा चिमटाही सातत्याने बंडोखोर आमदारांकडून काढला जात होता. मात्र बंडखोर आमदारांचा हात आरोप आपल्या वाढदिवसा दिवशी उद्धव ठाकरे यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट आपल्या कार्यकर्त्यांशी शिवसेना भवनातून अनेक वेळा संवाद साधला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना भेटण्याचा योग त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी साधला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वाढदिवसाला प्रतिज्ञापत्राची भेट : आपल्या वाढदिवसाला शिवसैनिकांनी येताना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नयेत. मात्र शुभेच्छा देण्यासाठी येत असताना आपल्या भागातील कार्यकर्त्यांच्या सदस्याच्या नोंदणीचे पत्राचे गठ्ठे शिवसैनिकांनी सोबत आणावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना केले होते. त्या आव्हानाला साद घालत शिवसैनिकांनी राज्यभरातून आज उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञा पत्रांचे गठ्ठे भेट म्हणून दिले. या प्रतिज्ञापत्रात चे महत्व उद्धव ठाकरे यांना चांगलेच माहित आहे. एकनाथ शिंदे गटाशी कोर्टामध्ये कायदेशीर लढाई करत असताना प्रतिज्ञापत्राचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी प्रतिज्ञा पत्राची भेट आपल्याला द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे शिवसेनेला पुन्हा बळ मिळणार? : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले. यामुळे राज्यभर शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली. तर दुसरीकडे अनेक कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम पाहायला मिळाला. गाव पातळीवरही शिवसैनिक संभ्रमात दिसून आले. त्यानंंतर राज्यभर शिंदे गट आणि शिवसेना असा राजकीय वाद चांगला पेटला आहे. अशातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वत: निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना भेटले. या यात्रेदरम्यान त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकाही केली. तर आमदारांना भेट देत नाही, असा आरोप असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांची थेट भेट घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी पाहिल्या तर शिवसेनेकडून पुन्हा नव्याने मोर्चे बांधणी सुरु असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Pravin Darekar : 'उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती तर...'; प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा