ETV Bharat / city

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, 'बंडखोरांना पर्याय शोधण्याचे आदेश', लवकरच महाराष्ट्र दौरा - Eknath Shinde

आपल्या पक्षातील आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) दु:खी झाले आहेत. 'पक्षात ज्यांना सर्व काही मिळाले ते बंडखोरी करत सोडून गेले आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते आजही माझ्या सोबत आणि शिवसेने सोबत आहेत.' असे म्हणत उद्धव ठाकरे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षातील आमदारांची बंडखोर भूमिका वेदनादायी असली तरी मी आता हार मानणार नाही. त्यामुळे या बंडखोरांना आता पर्याय शोधण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. आज शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ( Uddhav Thackeray On Rebel Shiv sena Leaders )

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये
author img

By

Published : Jul 5, 2022, 10:32 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह शिवसेनेत शिवसेनेतून तब्बल 39 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर, आता शिवसेनेतली उभी फूट संपूर्ण जगासमोर आली आहे. या बंडखोरांमध्ये आठ मंत्र्यांचा देखील समावेश असल्याने हे बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे आता दिसून येतेय. त्यामुळे या बंडखोरांना आता पर्याय शोधण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. आज शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ( Uddhav Thackeray On Rebel Shiv sena Leaders )

आता हार मानणार नाही - आपल्या पक्षातील आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे दु:खी झाले आहेत. 'पक्षात ज्यांना सर्व काही मिळाले ते बंडखोरी करत सोडून गेले आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते आजही माझ्या सोबत आणि शिवसेने सोबत आहेत.' असे म्हणत उद्धव ठाकरे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षातील आमदारांची बंडखोर भूमिका वेदनादायी असली तरी मी आता हार मानणार नाही. शिवसेनेला पुन्हा मजबूत पक्ष बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Assembly Speaker Election : राजकीय दबाव अन् लोकशाहीची थट्टा

बंडखोरांना पर्याय शोधा - या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांना पर्याय शोधा असे आदेश देखील दिले आहेत. जवळपास 40 आमदारांमध्ये काही मंत्री देखील असल्याने आता उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना पर्यायी उमेदवार शोधण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दादा भुसे, सुहास कांदे यांसह इतर अनेक बंडखोरांची यादी यामध्ये आहे. आपल्या मतदारसंघात, विभागात जास्तीत जास्त लोकांना भेटा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्यांचे प्रश्न सोडवा. लोकांना वेळ द्या, असे देखील उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सांगितला आहे.

उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा - या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे देखील जाहीर केले. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पुन्हा एकदा पक्ष संघटनेला उभारी देणार असल्याचे तसेच तळागाळातील लोकांना भेटून त्यांच्या समस्यांना तोंड देण्याचे व त्यांच्या भागात या बंडखोरांना पर्यायी नेतृत्व देणार असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत जाहीर केले. त्यांच्या या म्हणण्यानुसार आता उद्धव ठाकरे नेमके कधी महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर पडतात हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla : जीवन धन्य करणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घेऊया इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.