ETV Bharat / city

आता 14 जुलैपर्यंत मोफत मिळणार शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरू असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

shiv bhojan thali
शिवभोजन थाळी
author img

By

Published : Jun 18, 2021, 8:51 PM IST

मुंबई - राज्यातील गरीब जनतेला मोफत 'शिवभोजन' थाळीची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली.

मोफत शिवभोजन थाळीला मुदतवाढ -

'ब्रेक द चेन’ याअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब नागरिकांसाठी शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरू असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

आजघडीला राज्यात एकूण 1043 शिवभोजन केंद्रे सुरू -

शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 15 एप्रिल ते 17 जून या काळात 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी 70 लाख 18 हजार 184 थाळ्यांचे वितरण झाले आहे. राज्यात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 441 नवीन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून, यामुळे प्रतिदिन थाळ्यांची संख्या 44 हजार 300 ने वाढली आहे.

राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्याने मंजूर केलेल्या 441 केंद्रापैकी काही केंद्रे सुरू झाली आहेत. काही केंद्रे अल्पावधीतच सुरू होतील. आजघडीला राज्यात एकूण 1043 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.