ETV Bharat / city

Eknath Shinde Will Start Activity for Goverment : भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट तयार; चर्चेसाठी शिष्टमंडळ नेमणार - Delegation to Became Goverment with BJP

शिवसेना आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) गटाने आता राज्यातील सत्ता उलथवून लावण्याच्या हालचाली सुरू ( Move the Movement ) केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी शिष्टमंडळ ( Delegation to Became Goverment with BJP ) नेमण्यात येणार आहे. शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चू कडू यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून एकनाथ शिंदे यांच्या हाकलपट्टीचा निर्णय घेणार आहे. राजकीय घडामोडींना यामुळे आता वेग आला आहे.

Delegation to Became Goverment with BJP
भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी हालचाली
author img

By

Published : Jun 25, 2022, 10:38 AM IST

मुंबई : शिवसेना आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) गटाने आता राज्यातील सत्ता उलथवून लावण्याच्या हालचाली सुरू ( Move the Movement ) केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी ( Delegation to Became Goverment with BJP ) शिष्टमंडळ नेमण्यात येणार आहे. शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चू कडू यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून एकनाथ शिंदे यांच्या हाकलपट्टीचा निर्णय घेणार आहे. राजकीय घडामोडींना यामुळे आता वेग आला आहे.

शिंदे गटाकडून शिष्टमंडळ स्थापन : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्यास नकार दिल्याने एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. शिंदे यांच्या बंडात दोन तृतीयांश आमदार सहभागी आहेत. राज्यातील मविआचे सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी बंडखोर आमदारांची गुवाहाटी येथे बैठक घेऊन शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी मंत्री दादा भुसे आणि आमदार भरत गोगावले यांच्या नावाचा शिष्टमंडळात समावेश केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान देत, भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आज आयोजन केले आहे. दुपारी शिवसेना भवनात १ वाजता ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत बंडखोर आमदारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : Maharashtra political crisis : राजकीय उलथापालथ होत असताना देवेंद्र फडवणीसांनी केले हे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.