ETV Bharat / city

Sheena Bora Murder Case : शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा, सीबीआयकडून उत्तर दाखल - इंद्राणी मुखर्जी

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात ( Sheena Bora murder case ) अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सीबीआयकडून न्यायालयासमोर उत्तर दाखल करण्यात आले. यापूर्वी या प्रकरणावरील सुनावणी 4 फेब्रुवारीला झाली होती.

शीना बोरा हत्याकांड
Sheena Bora Murder Case
author img

By

Published : Feb 18, 2022, 12:45 PM IST

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणी ( Sheena Bora murder case ) सीबीआयने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर न्यायालयासमोर उत्तर दाखल केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होईल. इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोरा (Sheena Bora case) ही जिवंत असल्याचा खळबळजनक दावा केला होता. सीबीआयला एक पत्र पाठवले होते. या पत्रात इंद्राणीने, शीना बोरा ही जिवंत असून सध्या काश्मीरमध्ये वास्तव्य करत असल्याचे म्हटले होते. तुरुंगात मला नुकतीच एक महिला भेटली. तिने आपण शीनाला काश्मीरमध्ये भेटल्याचे सांगितले. त्यामुळे सीबीआयने शीनाचा काश्मीरमध्ये जाऊन शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणी मुखर्जी हिने पत्रात केली होती. याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती.

इंद्राणी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी शीना बोरा हत्येप्रकरणी 2015 मध्ये अटक केली होती. शीना ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी होती. इंद्राणी 'मीडिया टायकून' म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी. त्यामुळे शीना बोरा पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. 24 वर्षांची असताना शीनाची हत्या झाली होती. चौकशीदरम्यान शीनाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीचं नाव समोर आलं होतं. शीना बोराच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला खूनाप्रकरणी अटक करण्यात आली होती. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीविरोधात कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात, शीना बोरा खून प्रकरणी तिला मुख्य सूत्रधार म्हटलं आहे.

राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2015 ला शिना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला होता. इंद्राणी मुखर्जीला मदत केल्याप्रकरणी सीबीआयने पीटर मुखर्जी यांनाही अटक केली. पीटर यांना 2020 मध्ये जामीन मिळालाय. इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळून लावण्यात आला आहे. इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

इंद्राणी सर्वोच्च न्यायालयात जाणार?

इंद्राणी मुखर्जीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे इंद्राणी आता जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.

हेही वाचा - Sheena Bora Murder Case : सीबीआयला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत; पुढील सुनावणी 18 फेब्रवारीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.