ETV Bharat / city

शरद पवारांची नवी आघाडी हा बातमीत राहण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न - भाजप नेते माधव भंडारी - Sharad Pawar new front

शरद पवारांची नवी आघाडी हा त्यांचा बातमीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

BJP leader Madhav Bhandari
भाजप नेते माधव भंडारी
author img

By

Published : Jun 22, 2021, 8:06 PM IST

मुंबई - शरद पवारांची नवी आघाडी हा त्यांचा बातमीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संभाव्य आघाडी, हा राजकारणात शून्य अस्तित्व असलेल्या आणि जनाधार गमावलेल्या नेत्यांना केवळ बातमीत राहण्याकरिता केविलवाणा प्रयत्न असून, अशी कितीही शून्य एकत्र आले तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नसल्याची टीकाही भंडारी यांनी केली.

हेही वाचा - Jumbo Covid Hospital : रुग्णसंख्या घटल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बंद होणार

पवारांना अस्तिवत्व दाखवण्याची आखेरची संधी - भंडारी

पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठका आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखवण्यासाठी शरद पवार यांची धडपड, यामुळे अगोदर अस्तित्वात असलेली यूपीए आघाडी अधिक मोडकळीस आली आहे. पहिल्या आघाडीचे अस्त होत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचा डाव्या आघाडीचा प्रयत्न आहे. हे त्यांच्या राजकीय नैराश्‍याचे प्रतिबिंब आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जनाधाराची थट्टा करून विश्वासघाताने आघाडी करणाऱ्या शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखवण्याची अखेरची संधी आहे. एवढेच या धडपडीतून स्पष्ट होत आहे, अशी टीका भंडारी यांनी केली.

सोनिया गांधींची नाराजी ओढवून घेण्याची शिवसेनेची हिम्मत नाही

शरद पवार यांच्या बैठकीस त्यांचे विश्वासू शिवसेनेनेही दांडी मारण्याचे ठरवले. त्या बैठकीस हजेरी लावून सोनिया गांधींची नाराजी ओढवून घेण्याची शिवसेनेची हिम्मत नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. शिवसेना हा विश्वासू पक्ष आहे, असे प्रशस्तिपत्रक देणाऱ्या शरद पवार यांना शिवसेनेने धोबीपछाड देऊन आपल्या विश्वास पात्रतेचा या वेळेस पुरावा दिलेला आहे, अशी खरमरीत टीका भंडारी यांनी केली.

हेही वाचा - प्राध्यापक भरतीसाठी बेमुदत सत्याग्रह आंदोलन, युवसेना सचिव वरुण सरदेसाईंनी घेतली आंदोलकांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.