मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेक चर्चांना उधान येत असताना 15 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, गेल्या 15 दिवसांमध्ये उत्तर प्रदेशचे चित्र बदलले आहे. उत्तर प्रदेशमध्ये (UP Minister And MLA Resign ) भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील मंत्री आणि आमदार एकामागोमाग एक राजीनामे देत आहेत. यासंदर्भात शरद पवार ( Sharad Pawar Reaction On UP Miniter Resign ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन होईल, अशा चर्चा आता सुरू झाले असल्याचे मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अखिलेश यादव आणि शरद पवार यांची चर्चा -
उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवणार असून आज अखिलेश यादव यांनी शरद पवार यांच्यासोबत उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई पत्रकारांना दिली. तसेच लवकरच शरद पवार उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याबाबत काही तारखादेखील अखिलेश यादव यांनी शरद पवार यांच्याकडे मागितल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Mekedatu Padayatra : काँग्रेसला पदयात्रा बंद करण्याचे कर्नाटक राज्य सरकारचे आदेश