ETV Bharat / city

महात्मा फुलेंचे सत्यशोधक समाजाचे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्यासाठी प्रयत्न करावे- शरद पवार

author img

By

Published : Sep 26, 2022, 10:30 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की महात्मा फुले यांचे ( Mahatma Jyotirao Phule thoughts ) हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांचे हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी केले. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला ( Satyashodhak community ) १५० वर्ष पूर्ण होत आहेत.

शरद पवार
शरद पवार

मुंबई- महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्याचं हे काम पुढे नेण्याचे काम हे अतिशय चिकाटीचे आहे, गरजेचे ( Sharad Pawar on Mahatma Jyotirao Phule ) आहे. कारण महात्मा महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात ( Samata Parishad program in Pune ) बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की महात्मा फुले यांचे ( Mahatma Jyotirao Phule thoughts ) हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांचे हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी केले. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला ( Satyashodhak community ) १५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

शरद पवार म्हणाले की, समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद आणि अन्याय याची परिसीमा त्या काळी गाठली गेली होती अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजसुधारकांनी विचार रुजविले महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर रहावे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाचा केवळ आणि सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले. महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भावराव पाटील यांच्यसह अनेक समाजसुधारकांनी रुजविले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जिर्णोधार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ( Chagan Bhujbal on Sharad Pawar ) म्हणाले, की देशात अद्यापही अंधश्रद्धा दूर झालेली नाही. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र अनेक लोक देशांमध्ये अंधश्रद्धा वाढीला लागली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माधर्मात जातीजातीत भांडणे लावण्यात आहे. अन्याय अत्याचार होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी सत्यशोधक समाजाचे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरक असून हेच विचार देशाला या यादवीतून वाचवू शकतात असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

विचारांवर चालणारा एकमेव नेता देशात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा एकमेव नेता आहे, ते म्हणजे शरद पवार हे आहेत. त्यांनी महात्मा फुले यांचे स्मारक राष्ट्राला अर्पण करण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. महात्मा फुले यांनी जी आरक्षणाची संकल्पना मांडली त्यावर पवार यांनी प्रत्यक्ष काम केलं. त्यांनी मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करून ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकरणात आरक्षण देण्याचे काम, देशातील महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देऊन प्रतिनिधित्व देण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम त्यांनी केले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे संसदेच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी काम पवार यांच्या प्रयत्नांतून झाले असल्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

सत्यशोधक समाज गौरव सोहळ्यामध्ये ज्येष्ठ लेखक डॉ.आ.ह साळुंखे, संशोधक लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.भारत पाटणकर आणि स्व.गेल ऑम्वेट, ज्येष्ठ संशोधक विचारवंत प्रा.हरी नरके यांचा एक लक्ष रुपये, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.