ETV Bharat / city

शरद पवारांनी 15 दिवसात घेतल्या 60 सभा अन् दोन रॅली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ दिवसात राज्यात एकून ६० सभा घेतल्या. या सर्व सभा २१ जिल्ह्यात घेण्यात आल्या.

15 दिवसांत शरद पवारांच्या 60 सभा
author img

By

Published : Oct 19, 2019, 8:27 PM IST

Updated : Oct 19, 2019, 8:57 PM IST

मुंबई - राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला असल्याने राज्यात सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. त्याशिवाय राज्यातील जनता सुखी होणार नाही. यासाठी ऊन, पाऊस आणि वारा यासोबत आपल्या तबेतीची कोणतीही पर्वा न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तब्बल 60 सभा घेतल्या. या सभा राज्यातील 21 जिल्ह्यातील विविध मतदार संघात घेतल्या असून त्यात सर्वाधिक 25 सभा या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्या खालोखाल मराठवाड्यात 11 सभा घेतल्या आहेत. सर्वात कमी सभा या मुंबईत घेतल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारक नेमण्यात आले होते, त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या काळात 335 एकूण सभा घेतल्या असून यात एकट्या शरद पवार यांच्या 60 सभा आहेत. तर दोन रॅली व रोड शोचाही समावेश आहे. पवार यांनी कळवा-मुंब्रा या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना आणि वाळवा येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या पहिल्या प्रचार सभेपूर्वी पवार यांनी रोड शो केला होता. या दोन्हीही रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

शरद पवार यांची पहिली सभा उस्मानाबाद जिल्ह्यात भूम येथे आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती येथे सभा झाली. काल सातारा येथे भर पावसात झालेली सभा ही ऐतिहासिक ठरली. या सभेनंतर पवार यांना राज्यात आणि देशभरात सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. लाखो तरुणांनी त्यांच्या या सभेला आणि कर्तृत्वाला दाद दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या तबेतीमुळे केवळ 12 सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबई वगळून 35 सभा आणि 5 ठिकाणी रोडशो केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात एकूण 65 सभा घेतल्या असून यात मुंबईत एकही सभा पाटील यांनी घेतली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 48, खासदार अमोल कोल्हे यांनी 65, धनंजय मुंडे यांनी 38 तर खासदार सुनिल तटकरे यांनी 12 सभा आणि 5 चौक सभा घेतल्या आहेत.

Intro:15 दिवसांत शरद पवारांनी केल्या 60 सभा, आणि दोन रॅली

mh-mum-01-ncp-rally-all-maha-7201153

मुंबई, ता. 19 :

राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला असल्याने राज्यात सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. त्याशिवाय राज्यातील जनता सुखी होणार नाही, यासाठी ऊन, पाऊस आणि वारा यासोबत आपल्या तबियतीची कोणतीही पर्वा न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तब्बल 60 सभा घेतल्या.
या सभा राज्यातील 21 जिल्ह्यातील विविध मतदार संघात घेतल्या असून त्यात सर्वाधिक 25 सभा या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्या खालोखाल मराठवाड्यात 11 सभा घेतल्या आहेत. तर सर्वात कमी सभा या मुंबईत घेतल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारक नेमण्यात आले होते, त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या काळात 335 एकूण सभा घेतल्या असून यात एकट्या शरद पवार यांच्या 60 सभा आहेत. तर दोन रॅली व रोड शोचाही समावेश आहे. पवार यांनी कळवा-मुंब्रा या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना आणि वाळवा येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या पहिल्या प्रचार सभेपूर्वी पवार यांनी रोड शो केला होता. या दोन्हीही रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
शरद पवार यांची पहिली सभा उस्मानाबाद जिल्ह्यात भूम येथे आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती येथे सभा झाली. काल सातारा येथे भर पावसात झालेली सभा ही ऐतिहासिक ठरली असून या सभेनंतर पवार यांना राज्यात आणि देशभरात सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. लाखो तरुणांनी त्यांच्या या सभेला आणि कर्तृत्वाला दाद दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या तबियतीमुळे केवळ 12 सभा घेतल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबई वगळून 35 सभा आणि 5 ठिकाणी रोडशो केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात एकूण 65 सभा घेतल्या असून यात मुंबईत एकही सभा पाटील यांनी घेतली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 48, खासदार अमोल कोल्हे यांनी 65,धनंजय मुंडे यांनी 38 तर खासदार सुनिल तटकरे यांनी 12 सभा आणि 5 चौक सभा घेतल्या आहेत.Body:15 दिवसांत शरद पवारांनी केल्या 60 सभा, आणि दोन रॅलीConclusion:
Last Updated : Oct 19, 2019, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.