ETV Bharat / city

Sharad Pawar on Elections : सरकार सहा महिन्यांत कोसळेल; मध्यवर्ती निवडणुकीला तयार रहा - शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक ( NCP meeting ) यशवंतराव चव्हाण सेंटर ( Meeting at Yashwantrao Chavan Center ) येथे बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आमदारांना संबोधित करताना या सूचना केल्या. नवीन सरकारच्या मंत्रिमंडळ वाटपानंतर त्यांच्या आमदारांमध्ये नाराजी निर्माण होऊन बरेच आमदार स्वगृही परतण्याची शक्यता असल्याने मध्यवर्ती निवडणुकीला तयार ( Prepare for Midterm Elections ) राहण्याच्या त्यांनी सूचना केल्या.

NCP President Sharad Pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Jul 4, 2022, 7:08 AM IST

मुंबई : महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारला सत्तेपासून खाली ( Down from power )खेचून राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, हे सरकार सहा महिन्यांमध्ये कोसळेल. त्यामुळे सर्व आमदार आणि नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला ( Prepare for Midterm Elections ) लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत. शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर ( Meeting at Yashwantrao Chavan Center ) येथे सायंकाळी बैठक ( NCP meeting ) बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना या सूचना दिल्या आहेत.

कालच पार पडले विधिमंडळ विशेष अधिवेशन : नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर काल विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडले. त्यामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजप व शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी या निवडणुकीला विरोध केला होता. राज्यपालांनी बोलावलेल्या या निवडणुकीवरच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. राज्यपालांच्या भूमिकेविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

नवीन सरकारमधील आमदार फुटण्याची शक्यता : काल विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर शरद पवार यांनी सायंकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार, नेत्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेनेमधून बंडखोरी करून गेलेल्या आमदारांची मंत्रिमंडळ वाटपानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदार स्वगृही परत येण्याची शक्यतादेखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या कामांकडे लक्ष देण्याच्या सूचना शरद पवारांनी या बैठकीतून केल्या आहेत.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार : उद्या विशेष अधिवेशनात सरकारला बहुमत चाचणी द्यायची आहे. याबाबतचीदेखील चर्चा या बैठकीत पार पडली. तसेच, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते पददेखील राष्ट्रवादीला मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांच्या नावाची निश्चिती या बैठकीत झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा : Assembly Speaker Election : 'शिवसेनेच्या बंडखोर 39 आमदारांना निलंबित करा; विधानसभा अध्यक्षांना पत्र'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.