ETV Bharat / city

Sharad Pawar criticized CM : दबाव होता तर, पदाचा त्याग का नाही केला ? शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Press conference at Yashwantrao Chavan Pratishthan

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्यांची काम करण्याची एक चौकट आखलेली असते. त्यामुळे आता आपल्यावर दबाव होता, असं म्हणणं योग्य नसल्याचा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Sharad Pawar criticized CM Eknath Shinde) यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषदेत (Press conference at Yashwantrao Chavan Pratishthan) लगावला.

Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Sep 21, 2022, 4:45 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण मंत्री असलो तरी, आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता आपल्यावर प्रचंड दबाव आणला जात होता, असं सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगत आहेत. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला (Sharad Pawar criticized CM Eknath Shinde) आहे.

मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्यांनी असे वक्तव्य करू नये. जर तुमच्यावर दबाव होता तुम्हाला निर्णय घेता येत नव्हते. तर, मग पदाचा त्याग का केला नाही ? असा सवाल शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. मंत्री पदाची तुम्ही शपथ घेतली. तुमच्यावर महत्त्वाची शासकीय जबाबदारी होती. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्यांची काम करण्याची एक चौकट आखलेली असते. त्यामुळे आता आपल्यावर दबाव होता, असं म्हणणं योग्य नसल्याचा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषदेत (Press conference at Yashwantrao Chavan Pratishthan) लगावला.

मुख्यमंत्र्यांना घोषणा लिहून दिल्या जातात - मुख्यमंत्री सातत्याने केवळ लिहून दिलेल्या वाचत आहेत. अनेक वेळा बोलताना खाली बघून लिहून दिलेलं मुख्यमंत्री वाचतात. पण मुख्यमंत्री म्हणून स्वतः निर्णय घ्यावे लागतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घ्यावेत, लवकरात लवकर पालकमंत्री नेमावेत, असा सल्ला शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना (Sharad Pawar criticized CM) दिला.

राज्यात गुंतवणुकीचे वातावरण तयार झालं पाहिजे - वेदांता प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेला आहे, प्रकल्प गुजरातला गेला यामुळे आपल्याला दुःख नाही. मात्र राज्यात उद्योग धंद्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी चांगलं वातावरण तयार झालं पाहिजे. यासाठी सर्वच राजकीय पक्षाने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

मनसेला बोटावर मोजण्याचे प्रतिनिधी निवडून आणत नाही - शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंजरा ठेवलेला मांजर आहे. अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्या पक्षाला बोटावर मोजण्याइतके प्रतिनिधी ही निवडून विधिमंडळात पाठवता येत नाही. त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यायची ? असं म्हणत मनसेला टोला लगावला (Sharad Pawar in Press conference) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.