ETV Bharat / city

Sharad Pawar Criticism on Raj Thackeray : प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श - शरद पवार - राज ठाकरे

देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीवर प्रबोधनकारांनी नेहमीच टीका केली. धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना ठोकून काढा, असे नेहमीच प्रबोधनकारांनी सांगितले. आपण नेहमीच प्रबोधनकारांचे लिखाण वाचतो. मात्र, ठाकरे कुटुंबातील लोक प्रबोधनकार वाचत नसावेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला ( Sharad Pawar Criticism on Raj Thackeray ) आहे.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Apr 13, 2022, 2:58 PM IST

मुंबई - राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे आपले आदर्श आहेत. आपल्या धर्माचे प्रदर्शन आपण कधीही करत नाही. आतापर्यंत जेवढ्या वेळा निवडणुकीसाठी आपण उभे राहिलो, त्यावेळी बारामतीमध्ये आपण कोठे नारळ फोडतो याची माहिती राज ठाकरेंनी घ्यावी, असा टोलाही शरद पवार यांनी राज ठाकरे यांना शरद पवार यांनी लगावला ( Sharad Pawar Criticism on Raj Thackeray ) आहे. बुधवारी (दि. 13 एप्रिल) मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

काय म्हणाले होते राज ठाकरे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत, ते देवधर्म मानत नाहीत. तसेच शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव शरद पवार नेहमी घेतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना शरद पवार ( Sharad Pawar ) कधीही दिसत नाहीत, अशी टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मंगळवारी (दि. 12 एप्रिल) झालेल्या सभेत केली ( Raj Thackeray Criticism on Sharad Pawar ) होती.

ठाकरे कुटुंबातील लोक प्रबोधनकार वाचत नसावेत - देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीवर प्रबोधनकारांनी नेहमीच टीका केली. धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना ठोकून काढा, असे नेहमीच प्रबोधनकारांनी सांगितले. आपण नेहमीच प्रबोधनकारांचे लिखाण वाचतो. मात्र, ठाकरे कुटुंबातील लोक प्रबोधनकार वाचत नसावेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना लगावला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातून केवळ करमणूक - महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपणारा नसून इतर पक्षांना संपवणार आहे, असे राज ठाकरे आपल्या भाषणातून काय म्हणाले. मात्र, त्यांच्या पक्षाला मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत दोन जागा दिली नाही. राज ठाकरेंच्या केवळ सभा मोठ्या होतात त्या सभेमध्ये ते शिवराळ भाषा वापरतात, नकला करतात म्हणून लोकांची करमणूक होते, असा खोचक चिमटाही पवारांनी यावेळी काढला. तसेच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून धार्मिक, सामाजिक मुद्दे बोलून दाखवले. मात्र, सामान्य जनतेसमोर सध्या उपस्थित असलेले महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर ते काही बोलत नाहीत. सामाजिक एकतेला धक्का देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे, अशीही टीका शरद पवार यांनी राज ठाकरेंवर केली.

हेही वाचा - Jayant Patil Vs Raj Thackeray : वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा अन् विचारसरणी गोडसेची; जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.