मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट (Sharad Pawar CM Uddhav Thackeray Meet) घेतली. सुमारे दीड तास मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात भेट झाली असून, या चर्चेदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय मुद्द्यावर खासकरून या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Sabha) आणि भाजपकडून सातत्याने उपस्थित केला जाणाऱ्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर या बैठकीत (Loudspeakers Controversy MNS Sabha) चर्चा झाली.
हेही वाचा - Bhim Army Warn Raj Thackeray Aurangabad Sabha : औरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावू; भीम आर्मीचा इशारा
सर्वपक्षीय झालेल्या बैठकीनंतर भोंग्यांचा मुद्दा शांत होईल अशी अपेक्षा राज्य सरकारची होती. मात्र, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर हा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज्यामध्ये सातत्याने राजकीय नेत्यांकडून केले जाणारे धार्मिक वक्तव्यांवर आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था या मुद्दावर बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक - 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक मुंबईत होणार आहे. बिगर भाजपशासित जवळपास दहा राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असून या बैठकीबाबत च्या नियोजनाची देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारच्या विरोधात भक्कम विरोधी पक्ष उभा करण्यासाठी सुरु असलेल्या मोर्चेबांधणी च्या माध्यमातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. मुख्यमंत्र्यांची ही बैठक नेमकी केव्हा होईल यावर अद्याप स्पष्टता असली तरी मुंबईत या बैठकीचे नियोजन केले जाणार आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत