मुंबई - आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे म्हणणे शरद पवार यांनी जाणून घेतले. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून वेतनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यास शरद पवार यांनी सुचवले आहे. संप मागे घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
'आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत शरद पवार यांनी सुचवले ' -
माफक किमान वेतन आणि कोरोना काळातील कामाचा योग्य भत्ता मिळावा यासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचे अध्यक्ष एम.ए.पाटील यांची शरद पवार यांची मुबाईतील सिल्वर ओक निवस्थानी भेट घेतली. एम ए पाटील यांच्याशी शरद पवार यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे म्हणणे जाणून घेतले. यासंदर्भात महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून वेतनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यास शरद पवार यांनी सुचवले आहे. या चर्चेनंतर एम. ए. पाटील यांनी संप मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे शरद पवार यांनी ट्विट करून माहिती दिली. संप मिटवण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचाचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत.