मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Sharad Pawar and Uddhav Thackeray accept) यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले (invitation of Bharat Jodo Yatra) आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तांतर सुरू आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेते यात्रेत सहभागी होत आहेत. भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार व उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, ते त्यांनी स्वीकारले आहे.
पवार- उद्धव ठाकरे होणार यात्रेत सहभागी : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात (Sharad Pawar Uddhav Thackeray Bharat Jodo Yatra)आले.
भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद : भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोच आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभाही होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्व अधिक वाढले आहे. खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, आमदार सुधीर तांबे, आबा दळवी यांचा समावेश (Bharat Jodo Yatra) होता.