ETV Bharat / city

Aarey Forest : आरेतील पक्षांची तहान भागवण्यासाठी धडपडणारा अवलिया ! - Aarey Forest

आजच्या धावत्या जगात मुक्या प्राण्यांकडे पाहण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. अशी परिस्थिती असताना, शंकर सुतार सारखा तरुण समाजासमोर एक नवा आदर्श उभा करत आहेत. जोगेश्वरी येथे राहणारे शंकर सुतार ( Shankar Sutar Jogeshwari ) या उन्हाच्या धडाक्यात आरे जंगलातील ( Aarey Forest ) पक्षांना आपली तहान भागवता यावी यासाठी कष्ट घेत आहेत.

Aarey Forest
आरेतील पक्षांची तहान भागवण्यासाठी धडपडणारा अवलिया शंकर सुतार
author img

By

Published : May 23, 2022, 5:27 PM IST

मुंबई - खडक उन्हाचा फटका सर्वांनाच बसत असेल, अनेक वेळा उन्हाळ्यात प्राणी आणि पक्षांना पाण्याची देखील मिळत नाही. मात्र 'या' मुक्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे हाल लक्षात घेता समाजातले काही अवलिये नेहमीच त्यांच्यासाठी धावून जातात. मुंबईतील शंकर सुतार ( Shankar Sutar Mumbai ) हा तरुण पक्ष्यांची तहान भागवणारा असाच अवलिया आहे. ( Aarey Forest )

आरेतील पक्षांची तहान भागवण्यासाठी धडपडणारा अवलिया शंकर सुतार

आरेतील पाणवठे सुकले - सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे माणूसच नाही तर, प्राणी आणि पक्षी देखील हैराण झाले आहेत. अनेक वेळा या कडक उन्हात प्यायला पाणी न मिळाल्यामुळे प्राण्यांना आणि पक्षांना तडफडून आपले प्राण सोडावे लागतात. आजच्या धावत्या जगात मुक्या प्राण्यांकडे पाहण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. अशी परिस्थिती असताना, शंकर सुतार सारखा तरुण समाजासमोर एक नवा आदर्श उभा करत आहेत. जोगेश्वरी येथे राहणारे शंकर सुतार या उन्हाच्या धडाक्यात पक्षांना आपली तहान भागवता यावी यासाठी कष्ट घेत आहेत. मुंबईत असलेल्या आरेच्या जंगलात कडक उन्हामुळे अनेक पाणवठे सुकले. त्यामुळे या परिसरात असलेल्या पक्षांना आपली तहान भागवण्यासाठी शंकर सुतार यांनी आरे जंगलाच्या भागात कृत्रिम पाणवठे तयार केली आहेत. आरे जंगलाच्या परिसरात जवळपास त्यांनी आठ ते दहा कृत्रिम पाण्याचे पाणवठे तयार केले आहेत. त्या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी ते रोज स्वतः पाणी घेऊन जातात.

पक्षांसाठी पाण्याची सोय करावी यासाठी जनजागृती - शंकर सुतार हे मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये आपल्या आई सोबत राहतात. गेल्या दहा वर्षापासून मुक्या प्राण्यांना आणि पक्षांना मदत करण्याचा छंद ते जोपासत आहेत. शंकर सुतार हे मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण असून अंधेरी येथे गोल्ड मार्केट मध्ये कामाला आहेत. मात्र आपल्या कामातून वेळात वेळ काढून या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी ते रोज जोगेश्वरी ते आरे कॉलनी असा प्रवास करून, कृत्रिम पाणवठ्यांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांच्या पाण्याची सोय करतात. एवढेच नाही तर इतर लोकांनी देखील पुढाकार घेऊन आपल्या घरासमोर किंवा आपल्या परिसरात मुक्या प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठी पाण्याची सोय करावी यासाठी जनजागृती देखील करतात.

निसर्ग माझा संकल्पनेतून पाणीपुरवठा - नुकताच अंधेरी ते जोगेश्वरी लोकल प्रवास करताना त्यांनी पाण्याचे प्लास्टिक बॉटल आणि आणि जेवणाचे पार्सल साठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कंटेनर पासून पक्ष्यांसाठी पाण्याचा पानवठा तयार करण्यासाठी जनजागृती केली होती. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला. त्यांचे हे प्रयत्न पाहून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक आता त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र शंकर सुतार त्यांच्या कडून थेट मदत घेण्यापेक्षा त्यांच्या परिसरात त्यांनी मुक्या प्राण्यांसाठी पक्षांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असा सल्ला देत आहेत. प्रत्येक माणसाने निसर्गाची जपणूक केलीचं पाहिजे. आपण सर्वानी निसर्गाचे प्रेम केले पाहिजे या भावनेतून सुतार यांनी "निसर्ग माझा" संकल्पना सुरु केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ते निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीची जपणूक करा असे आवाहन समाजाला करत आहेत.

हेही वाचा - Amravati Waterman : भर उन्हात रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुंची तहान भागवणारा 'वॉटरमॅन'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.