ETV Bharat / city

ख्वाजा युनिस प्रकरण, त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा, आरोपी करण्याचा ख्वाजाच्या आईचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

ख्वाजा युनूस Khwaja Yunus शेखच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी बनवण्याकरिता ख्वाजा युनिसच्या आईने अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने आज फेटाळला आहे. त्यामुळे त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

author img

By

Published : Sep 7, 2022, 9:35 PM IST

ख्वाजा युनिस प्रकरण
ख्वाजा युनिस प्रकरण

मुंबई - घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी ख्वाजा युनूस शेखच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी बनवण्याकरिता ख्वाजा युनिसच्या आईने अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने आज फेटाळला आहे. त्यामुळे त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चार पोलीस आरोपी - ख्वाजा युनूस कोठडीतील मृत्यू प्रकरणातील चार पोलिस आरोपी बनवण्यासाठी युनिसच्या आईने अर्ज केला होता. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल भोसले, राजाराम होनमाने, हेमंत देसाई आणि अशोक खोत या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव होते. मात्र यासंदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने सत्र न्यायालयाने परवानगी देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.

बडतर्फ कर्मचार्‍यांसह सचिन वाझे यांच्यासह चार माजी पोलिस अधिकार्‍यांवर खुनाच्या आरोपाखाली खटला चालवला जात आहे. स्वेच्छेने कबुलीजबाब देण्यासाठी गंभीर दुखापत करणे पुरावे तयार करणे आणि या प्रकरणात गुन्हेगारी कट रचने या आरोपाखाली खटला सुरू आहे. या आरोपींचा जबाब नोंदून आता खटला सुरू होणार आहे. 19 ऑक्टोंबर रोजी पहिली साक्ष न्यायालयासमोर नोंदवण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यातून अटक - 2 डिसेंबर 2002 रोजी महानगरातील घाटकोपर रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार झाले. त्यानंतर त्या महिन्याच्या शेवटी ख्वाजा युनूस या 27 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. 2003 मध्ये पोलिस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. या खटल्यासाठी राज्याने नुकतीच नियुक्ती केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, या आरोपींवर खटला चालवण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणातील चार पोलिसांना आरोपी बनवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी च्या कलम 319 अंतर्गत अर्ज सादर करण्यात आला आहे. या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयात निकालावर अवलंबून नव्याने याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य आहे असे सरकारी वकील यांनी सांगितले.

हत्येच्या आरोपाखाली खटला - एप्रिल 2018 मध्ये माजी सरकारी वकील धीरज मिरजकर यांनी निवृत्त पोलीस कर्मचारी प्रफुल्ल भोसले आणि दलातील इतर तिघांविरुद्ध समन्स जारी करून त्यांना हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. मुख्य तक्रारदार साक्षीदार मोहम्मद अब्दुल मतीन यांनी भोसले, तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देसाई आणि इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी युनूसला पोलिस बंदोबस्तात मारहाण करताना पाहिले होते असा दावा करून कोर्टापुढे साक्ष दिल्यानंतर हा अर्ज दाखल करण्यात आला. त्याच महिन्याच्या शेवटी राज्य सरकारने या खटल्यात अधिवक्ता मिरजकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली.

काय आहे ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण - 2 डिसेंबर 2002 रोजी मुंबईतील घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटा ही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.