ETV Bharat / city

Malegaon bomb blast case : 19 वा साक्षीदारही फितूर घोषित; एटीएसने धमकाविल्याचा आरोप - कर्नल पुरोहित शेजारी साक्ष

साक्षीदार क्रमांक 19 याने ( Witness Number 19 in Malegaon case ) शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे ( martyred IPS officer Hemant Karkare ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावेळी एटीएस प्रमुख होते. जर साक्षीदार म्हणून या आरोपींविरोधात साक्ष देत नसेल तर तुम्हाला जेलमध्येच ठेवण्यात येईल, असे हेमंत करकरे यांनी धमकाविल्याचा दावा ( Witness allegations on Hemant Karkare ) साक्षीदाराने केला.

मुंबई सत्र न्यायालय
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Mar 24, 2022, 3:30 PM IST

Updated : Mar 24, 2022, 3:37 PM IST

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 19 व्या साक्षीदाराने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. साक्षीदाराने सांगितले की एटीएसने त्यांच्यावर दबाव टाकून साक्षीदार बनवून घेतले. साक्षीदाराने आज न्यायालयासमोर सांगितले आहे. तसेच गंभीर स्वरूपाचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवरदेखील आरोप केले आहेत.

न्यायालयात आज साक्षीदार हा साध्वी प्रज्ञा ठाकुर ( Sadhvi Pragya Thakur ) , कर्नल पुरोहित ( Colonel Shrikant Purohit ), , निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या 6 आरोपी संदर्भात साक्ष देण्याकरिता आला होता. त्यावेळी साक्षीदाराने म्हटले की माझा कुठलाही संबंध नाही. मी या आरोपींना ओळखत नाही. कर्नल पुरोहित हे माझ्या बाजूला राहत असल्याने मी त्यांना फक्त ओळखत आहे. बाकी इतर आरोपी आणि या प्रकरणाशी संबंधित मी कुणालाही ओळखत नाही.

हेही वाचा-Abortion pills illegally sale in Pune : पुण्यात बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना बेड्या

साक्षीदार फितूर म्हणून घोषित
साक्षीदार क्रमांक 19 याने ( Witness Number 19 in Malegaon case ) शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे ( martyred IPS officer Hemant Karkare ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावेळी एटीएस प्रमुख होते. जर साक्षीदार म्हणून या आरोपींविरोधात साक्ष देत नसेल तर तुम्हाला जेलमध्येच ठेवण्यात येईल, असे हेमंत करकरे यांनी धमकाविल्याचा दावा ( Witness allegations on Hemant Karkare ) साक्षीदाराने केला. त्यानंतर न्यायालयाने या साक्षीदाराला फितूर म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणात साक्षीदार क्रमांक 19 महत्त्वाचा साक्षीदार होता.

हेही वाचा-Pune Minor Girl Rape : पुण्यात ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार

19 जणांनी बदलली साक्ष
देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 19 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती. त्याने दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

एटीएसने दबाव टाकल्याचा आरोप
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींपैकी आजही एकाने जबाब बदल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 18 जणांनी जबाब बदलले आहेत. त्यामुळे नेमकी यंत्रणा कुठे कमी पडते, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, यापू्र्वी झालेल्या सुनावणीत साक्षीदाराने न्यायालयाला एटीएस अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा दावा केला होता. साक्षीदाराने त्यांच्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल. आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करावा यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर आव्हान उभे राहिले आहे. वारंवार बदलले जाणारे जबाबही त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करू शकतात.

हेही वाचा-Jalgaon Crime : बंदुकीचा धाक दाखवून बँक व्यवस्थापकाला जळगावात लुटले

एटीएस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 18 साक्षीदार फितूर झाले आहेत. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात एटीएस अधिकारी यांना उपस्थित राहण्यास संदर्भात निर्देश दिले होते. अद्यापही एटीएस अधिकारी यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास संदर्भात एटीएस अधिकाऱ्यांकडून कुठलेही पत्र न्यायालयात देण्यात आले नाही आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या आदेशांकडे एटीएस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या प्रकरणात आरोपी आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Last Updated : Mar 24, 2022, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.