ETV Bharat / city

Mumbai City Vaccination : डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार बूस्टर डोस

author img

By

Published : Dec 28, 2021, 2:42 PM IST

केंद्र सरकारने आता आरोग्य कर्मचारी, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस (Booster to senior citizens over 60 years) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गंभीर आजार आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बूस्टर डोस दिला जाईल. तसेच 15 तर 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण केले जाईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने ( Information of Mumbai Municipal Health Department ) दिली.

Mumbai  Vaccination
मुंबई लसीकरण

मुंबई : शहरामध्ये गेले पावणे दोन वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. त्यामुळे हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे ( Vaccination has started January 16 ). आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि 18 वर्षांवरील नागरिक असे टप्प्याटप्याने लसीकरण सुरू आहे. परंतु, आता कोरोनासह ओमायक्रॉनचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलां-मुलींचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत गंभीर आजार असलेल्या सुमारे 10 हजार ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे. पालिकेला ज्या लसी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळत (Vaccines received from Central and State Governments ) आहेत, त्यामधून लस दिली जाईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

9 लाख मुलांचे लसीकरण -
मुंबईत 15 ते 18 वयोगटातील 9 लाख मुले आहेत. त्यांना पालिका, सरकारी आणि खासगी 350 लसीकरण केंद्रावर लस घेता येईल. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोठ्या व्यक्तींच्या आणि लहान मुलांच्या लसीकरणावेळी सिरिन्ज आणि निडल (सुई) वेगळी वापरली जाते. केंद्र सरकारकडून याची माहिती येताच लसीकरण सुरू केले जाईल.

काय आहेत केंद्र सरकारच्या गाईडलाईन -
1) देशभरात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांना लस दिली जाणार आहे. या मुलांना कोवॅक्सिन लस दिली जाईल. 2007 पूर्वी जन्मलेले मुले यासाठी पात्र आहेत. कोविन ऍपवर या मुलांची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी अगोदर नोंद केलेल्या मोबाईल नंबरवरून किंवा नवीन मोबाईल नंबर वरून करता येणार आहे.

2) 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. दुसरा डोस घेतल्यावर 9 महिने म्हणजेच 39 आठवडे पूर्ण झाले असतील, अशा आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

3) गंभीर आजार आहेत, अशा 60 वर्षावरील वयोवृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ज्या वयोवृद्धांचे उत्पन्न कमी आहे, अशांना पालिका आणि सरकारी केंद्रांवर लस घेता येईल. तर इतरांनी खासगी केंद्रांवर लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. दुसरा डोस घेतल्यावर 9 महिने म्हणजेच 39 आठवडे पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.