मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी शिवेसना भवनात उद्धव ठाकरेंची सेना नेत्यांसोबत बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, लोकसभेच्या वेळीच, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात बैठक झालेली आहे. विधानसभेचा फॉर्म्युला तेव्हाच ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करू, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सेना भाजपात जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरत नसल्याची सध्या चर्चा आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी नाशिकमध्ये समारोप झाला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र यावेळी मोदींनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी युतीबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी युतीचा फॉर्म्यूला लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरलेला असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- कुठलीही खळखळ नाही
युतीचा निर्णय दोन दिवसांत समजेल, शिवसेना आणि भाजपात कोणतीही खळखळ नाही.
- आरेमध्ये मेट्रो कारशेडला आमचा विरोध आहे. हा विरोध विकास कामाबद्दल नाही. आरेत कारशेडला बवनणे याला विरोध आहे.
मोदींचा टोला मला नव्हता, तो बोलघेवड्यांना होता. कोर्टावर आमचा विश्वास आहे. पंतप्रधान बोलघेवड्यांना बोलले. मी बयानबाजी करत नाही. मी हिंदूंच्या भावना मांडलेल्या आहेत. पंतप्रधानांना विश्वास असेल की कोर्टाचा लवकरच निर्णय लागेल तर त्यासाठी थांबण्याची विनंती पंतप्रधानांनी केली असेल तर आमची तयारी आहे.
- 135-135 जागांच्या मागणीवर अजूनही ठाम
लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असून, 135-135 जागांच्या मागणीवर अजूनही ठाम असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.