मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वांद्रे परिसरातील निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा लागण झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित पोलीस कर्मचारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या 'संविधान' बंगल्यावर कार्यरत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना संक्रमण चाचणी करण्यात आली. यानंतर वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.