ETV Bharat / city

Section 144 in Mumbai : मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढला, 7 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू - mumbai covid cases

ओमायक्रॉन वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज 30 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू ( Section 144 Imposed in Mumbai ) करण्यात आले आहे. मोकळ्या आणि बंद ठिकाणीही पार्ट्यांवर बंदी असेल त्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब्स, रिसॉर्ट्स आणि क्लब मध्येही लोकांना एकत्र जमता येणार नाही.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Dec 30, 2021, 10:20 AM IST

Updated : Dec 30, 2021, 12:09 PM IST

मुंबई - जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron variant) चिंता वाढवली असतानाच आता भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus cases spike in India) होताना दिसत आहे. ओमायक्रॉन वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज 30 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू ( Section 144 Imposed in Mumbai ) करण्यात आले आहे. मोकळ्या आणि बंद ठिकाणीही पार्ट्यांवर बंदी असेल त्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब्स, रिसॉर्ट्स आणि क्लब मध्येही लोकांना एकत्र जमता येणार नाही.

Section 144 enforced till January 7 in Mumbai, Mumbai Police orders in view of increasing number of patients
जमावबंदीचे आदेश...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

एकट्या मुंबईत आढळले ओमायक्रॉनचे 33 रुग्ण -

मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली असून बुधवारी मुंबईत 24 तासांत अडीच हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ओमायक्रॉनचे 33 रुग्ण सापडले आहेत. राज्यात 3 हजार 900 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गृह विभागाने नवी नियमावली जाहीर केली आहे. शहरातील कोविड 19 आणि ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आजपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

नवी नियमावली -

बंदिस्त सभागृहातील कार्यक्रमामध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीला परवानगी आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी फक्त 25 टक्के उपस्थितीची परवानगी आहे. समुद्रकिनारी, बागेत आणि रस्त्यावर गर्दी करू नये, असंही आवाहन प्रशानसाकडून करण्यात आले आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आणि 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडू नये. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि यासारख्या पर्यटन स्थळी गर्दी करू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. अनेक जण नववर्षाचं स्वागत फटाके फोडून करतात. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी फटक्यांची आतिषबाजी करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Sindhudurg District Bank Election 2021 : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या 19 जागांसाठी आज मतदान

Last Updated : Dec 30, 2021, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.