ETV Bharat / city

MSRTC: विजेवर चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचा दुसरा टप्पा आता सुरू - राज्यात महत्त्वाच्या मार्गावर

MSRTC: विजेवर चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचा दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर शेकडो एसटी बसेस राज्यात महत्त्वाच्या मार्गावर चालवल्या जातील. MSRTC 1 जून 2022 पासून महाराष्ट्र एसटी महामंडळाने अहमदनगर- पुणे पहिली विजेवर धावणारी वातानुकूलित बस चालवली.

MSRTC
MSRTC
author img

By

Published : Oct 16, 2022, 7:35 PM IST

मुंबई: विजेवर चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचा दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर शेकडो एसटी बसेस राज्यात महत्त्वाच्या मार्गावर चालवल्या जातील. 1 जून 2022 पासून महाराष्ट्र MSRTC एसटी महामंडळाने अहमदनगर- पुणे पहिली विजेवर धावणारी वातानुकूलित बस चालवली.

जनतेचा प्रतिसाद आता यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई- पुणे या मार्गावर शिवाई या नावाने एसटी महामंडळाच्या बसेस चालवल्या जाणार आहेत. जनतेचा प्रतिसाद पाहता आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या बसेसला मागणी भरपूर आहे. पेट्रोलचा डिझेलचा इंधनाचा दर प्रचंड आहे. MSRTC दिवसाला कोट्यावधी रुपयाचे इंधन एसटी महामंडळाला लागते. मात्र विजेवर चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसमुळे इंधनाची बचत होईल.

दुसरा टप्पा पुढील काही दिवसात या दृष्टीने महाराष्ट्र एसटी महामंडळाने पहिला टप्पा जून 2022 मध्ये सुरू केला आहे. आणि आता दुसरा टप्पा पुढील काही दिवसात मुंबई- पुणे या मार्गावर तसेच राज्याच्या इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करणार असून शेकडो बसेस या मार्गावर धावणार आहेत. या बसेसमध्ये वातानुकूलित व्यवस्था असेल. अशी माहिती एसटी महामंडळ उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.