ETV Bharat / city

पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी मूर्तीकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

शाडूची मूर्ती बनवणे खर्चिक असते. त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यास सवलत मिळावी, अशी मागणी मूर्तीकारांनी केली आहे. यासाठी मूर्तीकारांच्या संघटनेने आज राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' वर भेट घेऊन निवेदन दिले.

ganesh sculptures in pen
पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी मूर्तिकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट
author img

By

Published : Oct 7, 2020, 2:26 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आल्यामुळे गणेशमूर्ती कारखानदार चिंतेत आहेत. शाडूची मूर्ती बनवणे खर्चिक असते. त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यास सवलत मिळावी, अशी मागणी मूर्तीकारांनी केली आहे. यासाठी मूर्तीकारांच्या संघटनेने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर भेट घेऊन निवेदन दिले.

पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी मूर्तीकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

पेण, रायगड, सोलापूर, पुणे व इतर शहरातील गणेश मूर्तीकार राज ठाकरेंच्या बंगल्यावर उपस्थित होते. पेणमध्ये जवळपास पाचशे कारखाने असून त्यात प्रत्येकी 5 ते 10 कामगार कार्यरत आहेत. संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे वीस ते पंचवीस हजार कारखाने आहेत. केंद्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी आणली आहे. शाडूच्या मातीची किंमत जास्त असल्याने सर्व खर्च भरून काढणे अव्हानात्मक होत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसवर सरकारने सवलत देण्याची मागणी जोर धरत आहे.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने चार फूट मूर्ती बनवण्याचे आदेश दिले होते, त्याचे आम्ही पालन केले. आम्ही तयार केलेल्या खूप मूर्ती अजूनही गोडाऊनमध्ये आहेत. कारखानदारांवर खूप मोठ्या प्रमाणात कर्जाचा भार आहे. त्यामुळे पीओपीवरची बंदी उठवावी, अशी मागणी मूर्तीकारांच्या शिष्टमंडळाने केली.

ganesh sculptures in pen
पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी मूर्तीकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

गणोशोत्सवासोबत देवीच्या मूर्तींचे कामही सहा महिने अगोदरच सुरू होते. मात्र यंदा रायगडमध्ये चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे कारखानदारांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

कर्जाच्या संदर्भातील काही बँकांची यादी मला द्या, आपण त्यासंदर्भातही बोलूया, असे आश्वासन राज ठाकरेंनी दिल्याचे मूर्तीकार नितीन पाटील यांनी सांगितले. तुमच्या सर्व प्रश्नांवर आपण मार्ग काढू या. दरवर्षी गणपती येतील आणि मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा होईल. केंद्र सरकारने पीओपीच्या मूर्तींवर प्रतिबंध लावण्यात येतील, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावर राज ठाकरे यांनी आपण काहीतरी मार्ग काढूया, असे आश्वासन दिल्याचे मूर्तीकार अध्यक्ष नितीन मोकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.