मुंबई - कोरोनाच्या प्रसारामुळे गेले दोन वर्षे बंद असलेल्या ( Schools reopen from 2nd in Mumbai ) शाळा येत्या २ मार्चपासून पुन्हा होणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray on Schools reopen ) यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत मुंबईतील कोविड स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरद्वारे मार्चपासून शाळा सुरू करण्याबाबत माहिती दिली.
कोरोना आटोक्यात आल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय ( Schools reopen in Mumbai ) घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Ashwinin Bhide ), सहआयुक्त अजित कुंभार (Ajit Kumbhar ) , चंद्रशेखर चौरे (Chandrashekhar Chaure ) उपस्थित होते.
लसीकरणाला प्राधान्य -
विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाईल. कोरोनापूर्व स्थितीप्रमाणे शाळा सुरू करताना वेळापत्रक, उपस्थिती, अभ्यासेतर उपक्रम, स्कूल बसेसची सुविधा याबाबत चर्चा झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियम पाळूनच शाळा सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असणार्या विद्यार्थ्यांना डोस देण्यासाठी पालकांच्या संमतीनुसार निर्णय घेण्यात येईल. पालिकेचा शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या सहाय्याने शाळांच्या आवारात १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
हेही वाचा-Russia Ukraine crisis: तुमच्या हातात सत्ता घ्या, व्लादिमीर पुतीन यांचे युक्रेनच्या सैन्यदलाला आवाहन
काय असतील नियम?
- विद्यार्थ्यांचे रोज तापमान तपासावे, मास्क घालणे बंधनकारक आहे.
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांचे लसीकरण गरजेचे आहे.
- विविध आजार व क्रॉनिक व्याधी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक आहे
- सर्दी खोकला ताप घसादुखी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. सध्या कोरोनाचे १०० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत.