मुंबई - आजपासून मुंबईतील शाळा सुरू ( Mumbai Schools Open ) झाल्या आहेत. या नवीन शैक्षणिक वर्षात सर्व शाळा आपापल्या विद्यार्थ्यांचे स्वागत ( Welcome students ) करत आहेत. असंच काहीसं स्वागत अंधेरीतील एका शाळेने केलं. मुलांचे स्वागत करताना पुस्तक भेट ( Book gift while welcoming children ) देण्यात आलं. एप्रिलच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी राज्याच्या शैक्षणिक मंडळाने 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू होतील अशी माहिती दिली होती. मात्र, कोरोना ( Corona ) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आगमनापूर्वी योग्य ती काळजी घेण्यासाठी 13 तारखेला प्रथम कर्मचाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला.
मुलांचं पुस्तक देऊन स्वागत- सोमवारी 13 तारखेला येऊन शाळेच्या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मुलांच्या स्वागताची तसेच कोविडच्या निर्बंधांचे सर्व तयारी केली होती. अखेर आज मुलं शाळेत दाखल झाली. अशातच मुंबईच्या अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलने मुलांना विविध पुस्तक देऊन त्यांचं शाळेत स्वागत केलं आहे. मुलांनाही पुस्तक देण्यामागे त्यांची वाचनाची आवड वाढावी तसेच त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून ही पुस्तक दिल्याचं शाळेचे शिक्षक सांगतात.
कोरोनामुळे 2 वर्ष शाळा बंद - दोन वर्ष आधीच कोरोनामुळे शाळा बंद होत्या. शैक्षणिक वर्ष संपते वेळी म्हणजे साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान शाळा दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे मागची दोन वर्ष मुलांना हा शाळेचा माहोल अनुभवता आला नव्हता. अगदी शाळा देखील शांत आणि ओसाड पडल्या होत्या. मात्र, यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच जून महिन्यापासूनच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने शाळेच्या परिसरात देखील मुलांचा किलबिलाट वाढला आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाची ब्लूप्रिंट - आजपासून शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण अशा स्थितीत यावेळी शालेय शिक्षण विभागाचे लक्ष एका मुद्द्यावरही केंद्रित ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. माहितीनुसार, ज्यांच्या मुलांनी काही कारणास्तव शाळा सोडली आहे किंवा महामारीच्या काळात ते फार कमी दिवसांसाठी शाळेत आले आहेत, अशा बहुतेक लोकांवर विभाग विशेष लक्ष देत आहे. या मुलांना पुन्हा शिक्षण व्यवस्थेत आणण्यासाठी सरकारने ब्लू-प्रिंट तयार केली आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं शाळांना पत्र - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही याबाबत एक पत्रक जारी केले आहे. त्या म्हणाल्या की, सर्व शाळांना अशा मुलांचा शोध घ्यावा लागेल ज्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण सोडले आहे. अशा मुलांना पुन्हा शाळेत आणावे लागेल. बुधवारी वर्ग पुन्हा सुरू होताच, अनेक मुलांची शाळेत पहिली पायरी असेल. त्यामुळे येथील वातावरण आनंदी, उत्साही आणि उपक्रमांनी परिपूर्ण करणे ही सर्व शाळांची जबाबदारी आहे.
हेही वाचा -Sanjay Raut : शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी दिल्लीतून आदेश.. न्यायालय, निवडणूक आयोग प्रचंड दबावाखाली