मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शालेय मुले हातभार लावताना दिसत आहे.
हेही वाचा... सोलापुराती मतदान केंद्रात मतदारांऐवजी वरुणराजाच बरसला
नागरिक म्हणून कर्तव्य असल्याचे विद्यार्थ्यांचे मत
राज्यभरात मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे. अशावेळी ज्येष्ठ, वयोवृद्धांना केंद्रावर सहकार्य करण्यासाठी विद्यार्थी सहाय्य करताना पहायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मानखुर्द शाळा क्रमांक 1 वरील मतदान केंद्रावर शालेय मुले मदत करत असल्याचे पाहायला मिळत आहे.