ETV Bharat / city

शाब्बास! पक्षांसह, गोरगरिबांना मदतीचा हात; सत्यपूर युवा मोर्चाचा पुढाकार

author img

By

Published : May 8, 2021, 10:19 PM IST

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना दररोजचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. पण सत्यपूर युवा मोर्चा सारख्या संस्थांनी जनतेची सेवा करणे सुरूच ठेवल्याने मुंबईतल्या हजारो गोरगरिबांना एक वेळचे जेवण मिळत आहे.

अन्नदान करताना
अन्नदान करताना

मुंबई - राज्यातील लॉकडाऊनचा फटका गोरगरीब आणि मजुरांना बसलेला आहे. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ या मजूर,गरीबांवर आली आहे. तसेच जसा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यापेक्षा जास्त मुक्या प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या सर्वांच्या मदतीसाठी मुंबईची एक सामाजिक संस्था पुढे आली आहे. फक्त अन्नदानच नव्हे तर या गरजू नागरिकांची कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात फळेसुद्धा वितरित करण्यात येत आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...

गोरगरिबांना मदतीचा हात

एका वर्षांपासून सुरुये अन्नदान

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना दररोजचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. पण सत्यपूर युवा मोर्चा सारख्या संस्थांनी जनतेची सेवा करणे सुरूच ठेवल्याने मुंबईतल्या हजारो गोरगरिबांना एक वेळचे जेवण मिळत आहे. खेतवाडी परिसरातल्या या संस्थेचे दक्षिण मुंबईत एकूण पाच ठिकाणी सेंटर चालत असून सध्या त्यांनी नरीमन पॉईंट इथल्या महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीतील लोकांसाठी अन्नदानाचे काम सुरु केले आहे. एकाच वेळी आठशे लोकांना अन्नदान करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, फक्त अन्नदानच नव्हे तर या गरजू नागरिकांची कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, अन्नदानात फळांच्या समावेश करण्यात आलेला आहे. हा उपक्रम गेल्या एका वर्षापसून सुरु असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

गोरगरिबांना वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न -

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला यंदा बाजारपेठेत नेहमीप्रमाणे विक्रमी किंमत मिळताना दिसत आहे. आंब्याचा मोसम नुकताच सुरु झाला असून सध्या बाजारपेठेत अत्यंत मर्यादित प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळताना दिसून येत आहे. तरीसुद्धा या संस्थेने गरिबांसाठी महागडे आंबे ही जेवणासोबत दिले आहेत. सध्या आंब्यांचा मौसम आहे. पण आंब्यांची किंमत जास्त असल्याने या गोरगरीब वर्गाला आंबे घेणे शक्य होत नाही. त्यामुळे संस्थेने मानवतेच्या दृष्टिकोनातून वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न केला असल्याचे संस्थेचे पदाधिकारी पोपट भाई मेहता यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

हेही वाचा - पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकर मोफत लसीपासून वंचित; भाजप खासदाराचा आरोप

गरिबांना मदतीचा हात -

या झोपडपट्टीजवळच मेट्रोच्या विधान भवन मेट्रो स्थानकाचे काम सुरु आहे. याप्रकल्पात काम करणारे अनेक मजुरांनी ही या अन्नदान उपक्रमाचा लाभ घेतला आहे. टाळेबंदी असल्याने बाहेर कुठेही हॉटेल सुरु नाहीत. आणि फेरीवालेही रस्त्यावर नाहीत ,त्यामुळे अनेक मजुराचीही कुचंबणा होते. या मजुरांनाही थोडा दिलासा मिळावा या हेतूने मजुरांनाही अन्नदान करण्यात येत असल्याचे वीरेंद्र दोशी यांनी स्पष्ट केले.

मुक्या प्राण्यांचीही काळजी -

शहरात पाच ठिकाणी असलेल्या सेंटरमधून दररोज ४ हजार लोकांना अन्नदान करण्याचे काम ही संस्था करत आहे. केवळ गोरगरीब लोकांनाच नाही तर कबुतरांनासुद्धा दाणे घालण्याचे काम अविरत सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात कबुतर खाने आहेत. त्या ठिकाणी अनेक जण दररोज कबुतरांना दाणे टाकण्याचे काम करतात, पण टाळेळेबंदीत लोकांना बाहेर पडण्यासही मज्जाव करण्यात आला आहे, अशा परिस्तिथीत या पक्षांची उपासमार होऊ नये यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड योद्धांची जेवणाची सोय-

मुंबईसह उपनगरात गेल्या एका वर्षांपासून कोरोनाच्या संकटकाळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुद्धा चहा-नाश्ता आणि जेवणाची सोय, सत्यपूर युवा मोर्चाकडून करण्यात येत आहे, या संस्थेत ८४ कार्यकर्ते आहे. याच्या माध्यमातून दररोज १ हजार ५०० पेक्षा जास्त कोविड योद्धांना जेवणाचे आणि नाश्ताचे पॉकेट वितरित करण्यात येत आहे.

हेही वाचा - पाकिस्तानमधील सर्वात कठीण प्रशासकीय सेवेत पहिल्यांदाच हिंदु महिलेची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.