ETV Bharat / city

Satish Uke : सतीश उकेंच्या वकिलांना भेटण्यापासून रोखले.. ईडीवर केले गंभीर आरोप - मुंबई सत्र न्यायालय

जमीन गैरव्यवहार प्रकरणात नागपूरमधून अटक केलेल्या वकील सतीश उके ( ED Arrested Advocate Satish Uke ) यांचे वकील रवी जाधव हे न्यायालयाच्या परवानगीने उके यांना भेटण्यासाठी गेले ( Advocate Ravi Jadhav Allegation On ED ) होते. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाची परवानगी असतानाही भेटू दिले नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

वकील रवी जाधव
वकील रवी जाधव
author img

By

Published : Apr 5, 2022, 6:59 PM IST

मुंबई- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके ( Nana Patole Lawyer Satish Uke ) आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांच्याविरोधात जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना 31 मार्च रोजी नागपूर येथून अटक करण्यात आली ( ED Arrested Advocate Satish Uke ) होती. उके बंधू 6 एप्रिलपर्यंत कोठडीत आहेत. आज सतिष उके यांचे वकील रवी जाधव त्यांना भेटण्याकरिता ईडी कार्यालयात आले असता, त्यांना भेटण्यापासून रोखण्यात आले. मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) परवानगी देऊन सुद्धा त्यांना भेटण्यास नकार देण्यात आला, असा आरोप वकील रवी जाधव यांनी केला ( Advocate Ravi Jadhav Allegation On ED ) आहे.

मूलभूत अधिकारांवर हल्ला : या संदर्भात रवी जाधव यांनी सांगितले की, 'मी आज सतिष उके यांना भेटण्यासाठी आलो असता, तपासी अधिकारी परमेश्वर शंकर यांनी मला भेटण्याची परवानगी दिली. मात्र, त्यांचे वरिष्ठ अधिकारी योगेश शर्मा यांनी मला भेटण्यासाठी नकार दिला. हा एकप्रकारे मूलभूत अधिकारांवर हल्ला आहे'. यासंदर्भात उद्या मुंबई सत्र न्यायालयात आम्ही अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार देखील करणार आहे. न्यायालयाने परवानगी दिली असताना हे भेटू देत नसतील तर एकप्रकारे कोर्टाचा अवमान झाल्यासारखेच आहे. एखाद्या आरोपीच्या वकिलाला भेटण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक प्रकरणात दिले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात देखील वकिलांना त्यांना भेटण्याची मुभा होती हे विसरले का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

सतीश उकेंच्या वकिलांना भेटण्यापासून रोखले.. ईडीवर केले गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.