ETV Bharat / city

Sanjay Raut Interview : संजय राऊतांची 'ती' मुलाखत व्हायरल - पत्राचाळ घोटाळा

अटकेच्या एका दिवसाआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांची एका वृत्तवाहिनीला मुलाखत प्रकाशित झाली होती. मात्र प्रकाशित झालेली ही मुलाखत (Sanjay Raut interview went viral) आत्ताची नसुन; पुष्कळ दिवसांआधीची असल्याचे मत,संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut Explanation) यांनी ईटीव्हीशी बोलतांना मांडले.

Sanjay Raut Interview
संजय राऊतांची मुलखत व्हायरल
author img

By

Published : Aug 2, 2022, 4:04 PM IST

Updated : Aug 2, 2022, 4:13 PM IST

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. अटकेच्या एका दिवसाआधी संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत (Sanjay Raut interview went viral) दिली होती. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले होते. मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांपासून, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता राऊत यांची मुलाखत व्हायरल झाली आहे. याबाबत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut Explanation) यांनी, ईटीव्हीला माहिती दिली.

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात भावनिक नाते : उद्धव ठाकरे दिल्लीत गेले असता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या प्रश्नाचे उत्तर देतांना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी व ठाकरे कुटुंबाचे जुने नाते आहे. आम्ही सत्तेत असो की नसो, भाजपने आमच्यासोबत कितीही राजकारण केले, तरी आमचा मोदींवर विश्वास आहे. आमचा अमित शहा यांच्यावर विश्वास आहे. ते देशाचे गृहमंत्री आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे ते भेटायला गेले आणि अर्धा-पाऊण तास चर्चा केली.

ठाकरे शिवाय शिवसेना नाही मोदी शिवाय भाजपा नाही : शिवसेनेसाठी ठाकरे कुटुंब का महत्त्वाचे, या प्रश्नाला उत्तर देतांना संजय राऊत म्हणाले की, भाजपला जशी नरेंद्र मोदींची गरज आहे. तशी शिवसेनेला ठाकरे कुटुंबाची गरज आहे. आजच्या तारखेत नरेंद्र मोदींशिवाय, भाजपचे अस्तित्व पाहू शकता का? भाजपचा जो विस्तार झाला आहे; तो नरेंद्र मोदींची ताकद आहे. त्यांची प्रतिष्ठा आहे. उद्धव ठाकरेंचेही तसेच आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय दिसत नाही. मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील; तोपर्यंत ते देशहिताचे काम करत राहतील.

पंतप्रधानपदाचा उत्तम उमेदवार कोण असेल? शरद पवार की राहुल गांधी? या प्रश्नाचे उत्तर देतांना राऊत म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकेल की नाही, हे सांगता येणार नाही. परंतु, भाजप मजबूत पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

देवेंद्र यांच्या बाबत सकारात्मक भावना : देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री का करण्यात आले? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सर्वांना सहानुभूती आहे. ते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी लढत होते. ते त्याला पात्र होते. आता सरकार स्थापन झाल्यावर त्यांना वेगळे करण्यात आले. ते आमचे मित्र आहे.

पत्राचाळ प्रकरण : पत्राचाळ प्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते, असे वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मी पत्राचाळ बघितली नाही. मला जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा मी ईडीसमोर हजर होईन. मी आजपर्यंत पत्राचाळही पाहिली नाही. मला एक-दोन वर्षांपूर्वी याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्यावर कळले. प्रवीणसोबत माझे नाते आहे. ते माझे मित्र आहे. प्रत्येकाचे मित्र असतात. तसेच ते भाजपचेही मित्र आहेत. असेही संजय राऊत यांनी पत्राचाळमधील मुख्य आरोपी प्रवीण राऊतसोबतच्या संबंधावर म्हणटले आहे.

तर ही मुलाखत आत्ताची नसुन, पुष्कळ दिवसांआधीची आहे. अशी माहीती सुनील राऊत यांनी ईटीव्ही ला दिली.

हेही वाचा : ED raids two places in Mumbai: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी

Last Updated : Aug 2, 2022, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.