ETV Bharat / city

आना हि पडेगा.. चौपाटीमे...बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा खोचक टोला! - नरहरी झिरवळ बंडखोर आमदार नोटीस

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे बंडखोर नेते गुवाहाटीत गेले आहेत. राज्यात मोठे राजकीय नाट्य येत असताना गुवाहाटीत शिवसेनेचे आमदार तळ ठोकून आहेत. त्यावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.

संजय राऊत ट्विट
संजय राऊत ट्विट
author img

By

Published : Jun 26, 2022, 7:50 AM IST

Updated : Jun 26, 2022, 8:55 AM IST

मुंबई- खासदार संजय राऊत यांचा ट्विटर करून शिवसेना बंडखोरांवर निशाणा ( Sanjay Raut tweet ) साधला आहे. किती दिवस गुवाहाटीत राहणार आहात, महाराष्ट्रात यावे लागेलच, असे त्यांनी ट्विटमध्ये सूचित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ ( Narahari Zirwal lateste news ) यांचा ऐटबाज असलेला फोटो टाकत बंडखोरांना डिवचले आहे. बंडखोरांनी हॉटेल बुकिंगचे आणखी काही दिवस वाढवल्याने राऊत यांनी त्यांना लक्ष्य केले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी बंडखोरांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. कारवाईचे सर्वाधिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. लवकरच ते निर्णय जाहीर करतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. बंडखोरांनी त्यानंतर हॉटेल रेडिसन ब्लू बुकिंग आणखीन काही दिवस वाढवून घेतले. संजय राऊत यांनी यावरून आज सकाळी नवे ट्विट करत बंडखोरांना लक्ष केले. 'किती दिवस लपणार गुवाहाटीमध्ये एक दिवस यावं लागेल चौपाटीमध्ये अशा शब्दांत निशाणा साधला. ट्विटमध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवल यांचा फोटो वापरला आहे. फोटोत अध्यक्ष झिरवल एक हात कमरेवर ठेवून वाट बघत असल्याचे दिसत आहे. बंडखोरांच्या प्रतीक्षेत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असल्याचे या फोटोतून भासवण्याचा राऊत यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे ट्विट जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.

  • कब तक छीपोगे गोहातीमे..
    आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO

    — Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कब तक छीपोगे गोहातीमे- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे बंडखोर नेते गुवाहाटीत गेले ( Shivsena Rebel MLAs in Guwahati ) आहेत. राज्यात मोठे राजकीय नाट्य येत असताना गुवाहाटीत शिवसेनेचे आमदार तळ ठोकून आहेत. त्यावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे... त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा फोटो ट्विट केला आहे. विशेष म्हणजे उपाध्यक्षांनी नुकतेच या बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविली ( Deputy speaker notice to Rebel MLAs ) आहे.

बंडखोरांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड- राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात गुजरातच्या सुरतमध्ये बंड पुकारला. सध्या बंडखोरांनी आसामच्या गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. बंडखोरांनी परत यावे, असे आवाहन शिवसेनेकडून सातत्याने केले. भाजपसोबत युती करण्याच्या भूमिकेवर मात्र बंडखोर एकनाथ शिंदे ठाम राहिले. पक्षादेश पायदळी तुडवत, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नवा गट तयार करून आव्हान दिले. सत्तासंघर्ष यामुळे चिघळला आहे. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले. काही ठिकाणी बंडखोरांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड करत निषेध व्यक्त केला.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी समक्ष मुंबईत यावे, असे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बंडखोर आमदारांना मुंबईत यावे लागणार असल्याचे म्हटले होते. अशा स्थितीतही बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतील मुक्काम ३० जूनपर्यंत वाढल्याचे सूत्राने सांगितले आहे.

बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार- एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदार आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. शुक्रवारी (दि.ल 25 जून) दुपारी विधिमंडळात सुरू झालेली बैठक तब्बल सहा तास चालली. या बैठकीनंतर 16 सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी बुधवारी सेनेच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला बंडखोर सदस्य अनुपस्थित राहिले. त्याप्रकरणी पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका सेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली होती.

दरम्यान, या 16 बंडखोरांना आपले म्हणणे विधानसभा उपाध्यक्ष यांच्यासमोर मांडावे लागणार आहे. बंडखोर सध्या गुवाहाटीत आहेत. या 16 आमदारांना त्यांचे म्हणणे 48 तासांत मांडण्याची सूचना केली आहे. त्यानंतर योग्य ती उपाध्यक्ष कारवाई करतील, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा-आमदार तानाजी सावंत यांच्या महाविद्यालयात शिवसैनिकांचा गोंधळ, बंडखोरीचा केला निषेध

हेही वाचा-Rebel Shivsena MLA : साहेब मध्यस्थी करा..बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांची चंद्रकांत खैरेंना फोनवरून विनंती

हेही वाचा-शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर, उद्धव ठाकरेंना मिळाला 'हा' मोठा अधिकार

Last Updated : Jun 26, 2022, 8:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.