मुंबई- ईडीने दुसऱ्यांदा नोटीस दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दुपारी ईडी कार्यालयात हजर राहिले आहेत. त्यांनी ही माहिती ट्विट करून ( Sanjay Raut tweet on ED notice ) दिली होती. राज्यात सत्तांतर झाले असताना संजय राऊत हे पहिल्यांदा ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. यापूर्वी त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणार असल्याचे म्हटले होते.
संजय राऊत यांनी सकाळी ट्विटमध्ये म्हटले, की मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर ( ED notice Sanjay Raut ) होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन ( Sanjay Raut appeal Shivsena workers ) करतो.
-
I will be appearing bfore the ED tody at 12 noon. I respect the Summons issued to me and it's my duty to co-operate with the Investigation agencies
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I appeal Shivsena workers not to gather at the ED office
Don't worry !@PawarSpeaks @OfficeofUT @MamataOfficial @RahulGandhi pic.twitter.com/Vn6SeedAoU
">I will be appearing bfore the ED tody at 12 noon. I respect the Summons issued to me and it's my duty to co-operate with the Investigation agencies
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2022
I appeal Shivsena workers not to gather at the ED office
Don't worry !@PawarSpeaks @OfficeofUT @MamataOfficial @RahulGandhi pic.twitter.com/Vn6SeedAoUI will be appearing bfore the ED tody at 12 noon. I respect the Summons issued to me and it's my duty to co-operate with the Investigation agencies
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2022
I appeal Shivsena workers not to gather at the ED office
Don't worry !@PawarSpeaks @OfficeofUT @MamataOfficial @RahulGandhi pic.twitter.com/Vn6SeedAoU
पक्षाचे काम करू नये, यासाठी दबाव - संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना ईडीच्या नोटीसवरून टीका केली होती. ते म्हणाले होते, की पक्षाच्या कामातून आता कुठे थोडा मला वेळ मिळालाय. त्यामुळे, मी उद्या ईडीला सामोरे जाणार आहे. जी कारवाई होईल त्याला तोंड देणार आहे. मी पक्षाचे काम करू नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, मी मागे हटणार नाही." असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला होता.
हजर राहण्यासाठी वेळ वाढवून देण्याची केली विनंती-संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना दोन दिवसांपूर्वीच ईडीने ( ED ) पहिली नोटीस बजावली होती. पहिल्या नोटीसनुसार संजय राऊत यांना आजच ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते, परंतु संजय राऊत यांच्या वकिलांनी यासंदर्भात हजर होण्यासाठी संजय राऊत यांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. आता त्यांना 1 जुलै रोजी बोलावण्यात आले आहे. मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळ्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. त्याबाबत त्यांची आज चौकशी होऊ शकते.
मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु - संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स ( ED summons Sanjay Raut ) 28 जूनला नोटीस बजावली आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना ईडीकडून पाठवण्यात आले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीचे हे समन्स ( Sanjay Raut in Land corruption ) आले आहे .ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत म्हणाले होते, की, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहेत. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे ट्विट करत राऊतांनी उत्तर दिले.
नेमके प्रकरण काय?- गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांवर ( Sanjay Raut in Goregaon Land corruption ) आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले होते, असाही आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक ( Praveen Raut arrested by ED ) करण्यात आली होती.
हेही वाचा-Sanjay Raut on Uddhav Thackerays resignation : बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ- संजय राऊत
हेही वाचा-Sanjay Raut on Uddhav Thackerays resignation : बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ- संजय राऊत
हेही वाचा-शिवसेना संपवण्याचे कोणी प्रयत्न करू नये- संजय राऊत