मुंबई : शेतकरी कायदा रद्द व्हावा यासाठी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. मात्र या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरयाणातील या भागातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून देणं हे दुर्देवी आहे, अशा शब्दांमध्ये राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्याप्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात येत आहे, यावरुन असं दिसत आहे की हे देशातील नाही तर बाहेरचे शेतकरी आहेत. त्यांना देण्यात येणारी वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे, असे राऊत म्हणाले.
हे शेतकरी पंजाब आणि हरयाणातून आलेत म्हणून त्यांना खलिस्तानवादी म्हणणं हा या देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी समाजात असाल तर याचा अर्थ हा आहे की, केंद्र सरकारला, पुन्हा एकदा पंजाबमध्ये तोच जुना काळ आणायचा आहे का असा प्रश्नही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. देशाच्या स्थिरतेसाठी चांगल नाही असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा : छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ला, जखमी मराठी असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव हुतात्मा