मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणी आता संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही गोष्टी खासगी, कौटुंबिक असतात त्या तशाच पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत. कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका नको असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
केवळ राष्ट्रवादीच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंनी काही भूमिका ठरवल्या होत्या, त्यामध्ये अशा प्रकाराला थारा दिला जात नव्हता. चारित्र्याचे हनन हे होतच राहणार आहे, मत्र असे केल्याने महाविकास आघाडी धोक्यात येईल हा भ्रम आहे.
केंद्र सरकारने समन्वयाची भूमिका घ्यावी..
शेतकऱ्यांना वाटते केंद्र सरकार आडमुठे आहेत, तर केंद्र सरकारला शेतकरी आडमुठे वाटतात. असे एकमेकांवर ढकलून हे प्रश्न सुटणार नाहीत. मी सरकारला एक पाऊल मागे घ्या असे नाही म्हणत, मात्र केंद्राने तडजोडीची आणि समन्वयाची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे राऊत शेतकरी आंदोलनाबाबत म्हणाले.
भाजपा विरोधी पक्ष, मात्र शत्रू नाही..
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू वा मित्र नसतो. भाजपासोबत आम्ही २५ वर्षं काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानत नाही. ते विरोधी पक्षात असले, तरी ते आमचेच सहकारी आहेत. त्यांनी गोड बोलावे, गोड हसावे, सरकारबाबत गोड विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस आणावेत असे म्हणत राऊत यांनी भाजपाला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : शिवसेनेने काँग्रेसला पुन्हा डिवचले; सीएमओवर उस्मानाबादचे झाले धाराशिव