ETV Bharat / city

Sanjay Raut On Rebel MLA : आरशात पाहतानाही लाज वाटते, संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल - Sanjay Raut Slammed rebel group

शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shivsena leader Sanjay Raut ) बंडखोर आमदारांवर ( Rebel MLA ) सातत्याने टिका करीत आहेत. आता त्यांनी अस्वलाचा आरशासमोरील व्हिडिओ ट्विट करीत या उपरोधिक टिका केली आहे. हे ट्विट करीत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जेव्हा स्वतःलाच आरशात पाहतानाही लाज वाटते. बंडखोरांवर टोकदार शब्दात टिका करतानाच गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत हे शिवसेनेची बाजू सांभाळून घेतानाही दिसत आहेत.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : Jul 10, 2022, 1:00 PM IST

मुंबई - शिवसेनेमध्ये बंडखोरी होऊन आमदारांचा मोठा गट फुटला आणि राज्यात सत्ताबदल झाला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) विराजमान झाले. सत्ताबदल झाला तरी आरोप-प्रत्यारोपांचा खेळ अद्याप थांबलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena leader Sanjay Raut ) हे सातत्याने बंडखोर आमदारांवर ( Rebel MLA ) टिका करीत आहेत. आज त्यांनी ट्विटद्वारे हल्लाबोल करीत स्वतःलाच आरशात पाहतानाही लाज वाटते, असे ट्विट केले आहे.

  • जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते.. https://t.co/bAPoUgzad1

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अस्वलाचा व्हिडिओ केला ट्विट - संजय राऊत यांनी अस्वलाचा आरशात बघतानाचा व्हिडिओ आज ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करीत त्यांनी बंडखोर आमदारांवर उपरोधिक टिका करीत लिहिले आहे की, स्वतःलाच आरशात बघतानाही लाज वाटते. शिवसेनेची बाजू ठामपणे मांडणारे संजय राऊत हे विरोधकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सातत्याने विविध माध्यमांद्वारे ते बंडखोर आमदारांवर ( Rebel MLA ) सध्या हल्लाबोल करीत आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेला आघात ( Sanjay raut on rebel shivsena mla ) झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर शिवसेनेने सावरत स्वत:ची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती सुरू केले. मुंबईत काही ठिकाणी शिवसेनेचे मेळावे झाले. यावेळी बंडखोरांवर शिवसनेच्या मोठ्या नेत्यांनी टीका केली. शिवसेनेच्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांची तोफ धडाडली होती. त्यांनी बंडखोरांवर घणाघात केला. त्या 40 जणांचे जिवंत शरीर परत येतील पण, त्यात आत्मा नसेल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते.

बेकायदेशीर सरकार - एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संपूर्णत: बेकायदेशीर आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी तारीख दिलेली नव्हती. हे सरकार झुंडशाहीमधून स्थापन झालेले आहे. राज्यपाल हे स्वतंत्र आणि घटनेचे पालन करणारे नाहीत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut React on Devendra Fadnavis Gov ) यांनी केली होती. राज्यपालांवरही त्यांनी अनेकदा टिका केली. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी परवानगी दिली नाही. बंडखोर गटाच्या सरकार स्थापनेसाठी आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांनी तातडीने तारीख कशी दिली, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला होता.

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल - संजय राऊत यांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचाही ( Balasaheb Thackeray ) फोटो ट्विट केला आहे. या फोटोला त्यांना केवळ विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल... अशी कॅप्शन टाकली आहे. हा फोटो ट्विट करीत आमची श्रद्धा विठ्ठलावर असून आमचा एकच विठ्ठल आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असे सूचविले आहे.

  • विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल...
    विठ्ठल...विठ्ठल... विठ्ठल.. pic.twitter.com/q2jdxdv3oA

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.