मुंबई - शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी सेनेचे 40 आमदार फोडले. त्यांचे हे बंड यशस्वीही झाले आणि त्याची परिणीती एकनाथ शिंदे यांचेच सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. शिंदे यांची बंडखोरी शिवसेनेच्या नेत्यांना रुचली नाही. राज्यसभा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी तर बंडखोर आमदारांवर अत्यंत वाईट शब्दात आरोप केले होते. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करीत आमच्या मतांवर राज्यसभा खासदार झालेल्या राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
संजय राऊत यांना आम्ही निवडून दिले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी त्यांना मतदान केले म्हणून ते निवडून येऊ शकले. निवडून आल्यावर त्यांनी त्यांनी आम्हाला जिवंत प्रेते, डुक्कर मेलेले प्राणी अशा उपमा दिल्या. ही अतिशय खालच्या पातळीवरची भाषा आहे. खासदार असलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभते का, त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. संजय राऊत हे आम्हा शिवसेना आमदारांच्या मताने निवडून आलेले राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अन्य पक्षांकडून मत घेऊन निवडून वं असा सल्ला हे केसरकर यांनी दिला.
हेही वाचा -