मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची अहमदाबाद इथे गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय गुढ आहे ? ते भेटले की नाही. हे माहिती नाही. मात्र, अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. जर झाली आहे. तर त्याच चुकीचे काय आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले.
गृह मंत्री आमित शाह यांनी काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असे म्हटलं. जर त्या दोघांनी भेट घेतली. तर काहीच चुकीचे नाही. तसेच राजकारणात कुठल्याच बैठकी गुप्त नसतात. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असते, असेही ते म्हणाले.
महाविकासआघाडी पूर्ण ताकदीने काम करणार -
आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटतो. तेव्हा नक्कीच राजकीय चर्चा देखील होतात. कारण ते आमचे प्रमुख नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार. तसेच महाविकासआघाडीला काहीही धोका नाही. शंभर टक्के महाविकासआघाडी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. एकमेकांवर टीका-टिप्पणी होत असते आणि ते झालं पाहिजे. सत्य बोललं पाहिजे, असे राऊत म्हणाले.
विरोधकांनी प्रेमाची होळी खेळावी -
देशपातळीवर महाराष्ट्राचा नाव खराब होत चाललं आहे. परंतु ज्या पद्धतीने विरोधात वातावरण बनवत आहेत. तसेच त्यांना आम्ही बनवू नाही देणार, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी विरोधकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना कोणताच रंग नाही. ते बेरंग आहेत. त्यांना रंग असता तर त्यांनी चांगलेच रंग उधळले असते. त्यांनी आमच्या बरोबर येऊन प्रेमाची होळी खेळावी. त्यांनी आरोपांचे रंग उधळून नयेत, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादी-भाजपमध्ये काहीतरी शिजतंय..? शरद पवारांसोबत बैठकीबाबत अमित शाह यांचे सूचक वक्तव्य