मुंबई - मागील काही दिवस संसदीय अधिवेशनानिमित्त दिल्लीला असलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत आता पुन्हा एकदा मुंबईत परतले आहेत. दिल्लीवरून मुंबई येताच त्यांनी सर्वप्रथम मातोश्रीला जात माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. त्यासोबतच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी हा विषय देखील गुरुवारी महत्वाचा होता. या सर्व घडामोडी होत असताना राज्यात पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्याचं चित्र गुरुवारी दिसले आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं असून, ते मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा - यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती पदी ( President Draupadi Murmu ) विजयी झाल्या आहेत. संपूर्ण देशभरात त्यांना भरभरून मतदान झालं आहे. त्यात शिवसेना सुद्धा आहे. या विजयात शिवसेनेचा देखील खारीचा वाटा आहे. देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून त्यांचं रुजू झाल्याची गुरुवारी घोषणा झाली. तळागळातल्या आदिवासी समाजातील महिला ओडिशा सारख्या दुर्गम भागातील महिला समाजकारणात देशाच्या राष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च पदावरती विराजमान होतात आम्हाला आनंद होत आहे. आणि त्यांच्या विजयामध्ये आमचा खारीचा वाटा आहे याचा मला अभिमान आहे.
उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर - सध्या माजी मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यांना राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "या महाराष्ट्र दौऱ्यात संपूर्ण राज्य पिंजून काढण्याचं लक्ष सध्या त्यांच्यासमोर आहे. आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून त्यांची संवाद यात्रा सुरू केली आणि ठाण्यापासून ते पुढे गेले. ठाणे जिल्ह्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे जिकडे जिकडे ते जातात तिथं तरुणांचा, लोकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना जिंदाबाद चे नारे लावले जात आहेत. त्यामुळे सध्याचं वातावरण हे भविष्यात पूर्ण महाराष्ट्र शिवसेनामय झालेलं दिसेल. याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून झाले आहे. लवकरच उद्धव ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर जातील त्याची तयारी सुरू आहे.
मोठा लढा द्यावा लागेल - महाराष्ट्रात मागील काही दिवस सुरू असलेल्या सत्ता नाट्याच्या संघर्षाच्या वेळी काही शांत असलेल्या तपास यंत्रणा आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चित्र देशभर पाहायला मिळाले आहे. यात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची झालेली चौकशी असेल अथवा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर झालेले कारवाई असेल या तपास यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्रणावरती राजकीय दबाव आहे जे सरकारच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रा लढत आहेत त्यांच्यावर दबाव आहे अशा प्रकारे. संविधानाच्या सत्य आणि न्यायव्यवस्थेसाठी आम्हाला मोठा लढा द्यावा लागणार आहे." अशी प्रतिक्रिया संजय राऊत ( Sanjay Rauts reaction )यांनी दिली आहे.
हेही वाचा : Aditya Thackeray Aurangabad Visit: बंडखोर आमदार विरोधात आदित्य ठाकरे करणार सेनेचे शक्तिप्रदर्शन