मुंबई-मी काय बोललो, त्यांचा आत्मा मेलेला आहे. फक्त ते जिवंत आहेत आणि ते खरं आहे. माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला. जिवंत प्रेत हा मराठीतला एक शब्दप्रयोग आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वादग्रस्त विधानावर ( Sanjay Raut clarification on statement ) स्पष्टीकरण दिले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut Slammed Gulabrao Rao ) म्हणाले, की गुलाबराव पाटलांचे ट्विट मी वायरल केल आहे. ते फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये ते आपला बाप बदलत आहेत. ती भाषा त्यांचीच आहे. पक्षात खातात पितात व मग बाप बदलतात. दीपक केसरकर आमचे जवळचे होते. उदय सामंत आमचे जवळचे होते. गुवाहाटीमध्ये गेलेले सर्व आमच्या जवळचे आहेत.
भारतीय पक्षाची गुलामी पत्करून सुरक्षा- पुढे संजय राऊत म्हणाले, की एकनाथ शिंदे हेसुद्धा आमच्या जवळचे आहेत. ही कायद्याची लढाई आहे. रस्त्यावरची लढाई व कायद्याची लढाई दोन्ही बाजूंनी होत राहील. शरद पवारांनी सुद्धा काल सांगितलं तुमच्याकडे ५० आमदारांच समर्थन आहे मग तुम्ही थांबलात कशाला? भारतीय पक्षाची गुलामी पत्करून सुरक्षा मिळवावी लागते. पण तुम्हाला वणवण फिरायची गरज काय? महाराष्ट्रातही दऱ्या, डोंगर, हिरवळ आहे. तुम्ही अशा लोकांबरोबर कसे संबंध बनवू शकता ज्यांचे मेहबूबा मुक्ती बरोबर संबंध आहेत. संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना टोमणा मारला आहे.
उदय सामंत यांच्या जाण्याने धक्का नाही-बाप बदलण्याची भाषा माझ्या आधी गुलाबराव पाटलांनी केली. महाराष्ट्राची संपर्क तुटल्याने माझ्या भाषणाचे चुकीचे अर्थ काढले. एकनाथ शिंदे हे आमच्या आजही जवळचे आहेत. आज कायदेशीर लढाई आहे. रस्त्यावरचीही लढाई होत राहील. उदय सामंत यांच्या जाण्याने धक्का नाही.
हेही वाचा-Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचे आमदार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार - दीपक केसरकर
हेही वाचा-Eknath Shinde Tweet : दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं समर्थन कसं?