ETV Bharat / city

'महाराष्ट्रात कर्नाटक प‌ॅटर्न राबवण्याचा डाव, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात पैसा आणि सत्तेच्या जोरावर कर्नाटकप्रमाणे घोडेबाजाराचा प्रयत्न... परंतु महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही... संजय राऊत यांचे वक्तव्य..

संजय राऊत
author img

By

Published : Nov 8, 2019, 10:41 AM IST

Updated : Nov 8, 2019, 10:50 AM IST

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस अधिक तिव्र होताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी राऊत यांनी 'राज्यात कर्नाटक प्रमाणे घोडेबाजार करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र इथे ते तंत्र चालणार नाही', असे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा... राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार, 'असा' आहे इतिहास

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकट्याला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. मात्र युतीला स्पष्ट बहुमत आहे. परंतु मुख्यमंत्री पदावरून युतीचे घोंगडे अडकले आहे. यातच राज्यात सत्ता स्थापनेसाठी कर्नाटक प्रमाणे घोडेबाजार होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, आम्ही सर्व एक असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;

  • पैसा आणि सत्तेच्या जोरावर कर्नाटक प्रमाणे घोडाबाजाराचा प्रयत्न
  • कर्नाटक पॅटर्न इथं महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही सर्व एक आहोत
  • भाजपकडे बहुमत असेल तरच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील

Intro:Body:

- गडकरी मुंबईत रहातात त्यामुळे ते येत असतील 

- पत्र घेऊन गडकरी येत आहेत का तुम्हाला सांगितलं आहे का 

- कोणाच्याही मध्यस्तीची गरज नाही 

- उद्धव ठाकरेंनीच मध्यस्तीची गरज नसल्याचे सांगितले 

- शिवसेना आणि भाजपचा निर्णय आहे तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही 

- आम्ही निर्णयावर ठाम 

- अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदा बाबतचं पत्र गडकरी घेऊन येणार आहेत का 

- राष्ट्रपती शासन लावून सत्ता करायची असेल तर तो महाराजांचा अपमान जनतेचा अपमान 

- काय करायचं आणि काय होणार हे आम्हाला माहित आहे 

- पैसा आणि सत्तेच्या जोरावर कर्नाटक प्रमाणे घोडाबाजाराचा प्रयत्न 

- पवार झुकले नाहीत ठाकरे पण झुकणार नाही 

- आम्ही रणागणातून पळून जाणार नाही लाचार होणार नाही 

- लढणार आणि जिंकणार हाच अटलजींचा संदेश 

- कर्नाटक पॅटर्न इथं चालणार नाही. आम्ही सर्व एक आहोत 

- भाजपकडे बहुमत असेल तर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील 

- काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहण्याचा डाव, सुत्र हलवायची आहेत 

- त्यांनी राजीनामा दिला पाहीजे घटनेचा जनादेशाचा हा अवमान आहे 

- काळजीवाहू हंगामी बसायचे आणि सुत्र हलवाची हा महाजनादेशाचा अपमान 

- मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाचं लागेल 

-काळजीवाहू सरकार महाराष्ट्रात नको.....असं प्रमुख राजकीय पक्षांना वाटतं साठी हालचाली या राज्याच्या हिताच्या 

- लवकरच राज्यपालांची भेट घेणार....तेच राज्याचे प्रमुख असतील 

- ही वेळ ज्यांनी आणली आहे त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे लागेल 

- अमित शाहं समोरच सर्व झाले होते. त्यांना सर्व माहित आहे.  

Conclusion:
Last Updated : Nov 8, 2019, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.