मुंबई : शिवसेना नेते व खासदार आजपासून दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. 'नागपूर हा हिंदूंचा गड आहे आणि अशा विदर्भात शिवसेनेचा झेंडा मजबूत करण्यासाठी ( Shivsena In Vidarbha ) मी नागपूरला जात आहे.' असं राऊत यांनी ( Sanjay Raut Nagpur Tour ) सांगितले. ते आज मुंबईतील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले राऊत? : "नागपूर आणि संपूर्ण विदर्भ हा हिंदूंचा हिंदुत्वाचा गड आहे. त्यामुळे अशा गडावर शिवसेनेचा झेंडा मजबूत होण्यासाठी मी दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहे. आम्हाला संपूर्ण राज्यभरात आमचं पक्षसंघटन वाढवायचे आहे. त्याची सुरुवात आम्ही नागपूरपासून करतोय. निश्चितच आगामी काळात त्याचा परिणाम देखील तुम्हाला दिसेल. यात नागपुरात काही संघटनात्मक बदल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः ( CM Uddhav Thackeray ) विदर्भाकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर काहीच दिवसात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील नागपूर दौऱ्यावर ( Aaditya Thackeray Nagpur Tour ) जातील." असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हा दौरा म्हणजे 2024 ची तयारी : हा दौरा म्हणजे निवडणुकीची तयारी आहेत का ? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, "निश्चितच, आम्ही 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने ( 2024 Assembly Elections ) हे पक्ष संघटन वाढवून आहोत. त्यादृष्टीनेच आमचा हा दौरा आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांचे तसे निर्देश आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा ते वेळोवेळी आढावा घेत असतात. तसंच विदर्भातील इतर पक्षांचे नेते अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने आम्ही पावले टाकत आहोत. त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितच निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसतील." दरम्यान, संजय राऊत यांच्या वाढत्या नागपूर दौऱ्यातून फडणवीसांच्या नागपुरात शिवसेनेला यश मिळवणे खरंच शक्य होईल का ? हे येत्या निवडणुकांमधूनच स्पष्ट होईल.